लऊळ ग्रामपंचायतीने केली निर्जंतुकाची फवारणी ; लाऊडस्पीकरच्या साहाय्याने केली जाते जनजागृती
प्रतिनिधी-[ कालीदास जानराव ] - जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे.देशातील नागरिकांची सुरक्षा म्हणून सरकार सर्वतोपरी उपाय योजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लऊळ ग्रामपंचायतीने सोडियम हायड्रोक्लोराईडची संपूर्ण गावात ट्रॅक्टरच्या साहाय्याने फवारणी केली आहे.त्यामुळे नागरिकात दिलासादायक वातावरण आहे.तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने लाऊडस्पीकरच्या साहाय्याने नागरिकांमधून कोरोना विषाणू विषयी जनजागृती केली जात आहे.नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग राखावे यासाठी खबरदारी घेतली जात आहे.गावकऱ्यांचे कोरोना प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे गावच्या सरपंच प्रियंका कांबळे यांनी सांगितले.
0 Comments