डॉक्टरांना कोरोना कीट, विमा सरंक्षण द्यावे ; साऊथ सोलापूर डॉक्टर असो.ची मागणी
सोलापूर : शहर आणि ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणार्या खासगी डॉक्टरांना कोरोना कीट आणि विमा सरंक्षण देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी मागणी साऊथ सोलापूर डॉक्टर्स असोसिएशनने आ. सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शहर आणि ग्रामीण भागात कामकरताना अनेक अचडणी येत आहेत. अशा परिस्थितीतही आम्ही सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. मात्र आम्हालाही आमचे आरोग्य महत्वाचे आहे. याचा विचार करून सर्व डॉक्टरांना कोरोना कीट आणि विमा सरंक्षण द्यावे, असे असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या मागण्या आपण शासन दरबारी पोहचवू आणि पाठपुरावा करू, असे आश्वासन आ. देशमुख यांनी दिले आहे.
0 Comments