Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तहसील कार्यालयात आ.यशवंत(तात्या)माने यांच्या अध्यक्षतेखाली आढाव बैठक संपन्न

मोहोळ तहसील कार्यालयात आ.यशवंत(तात्या)माने यांच्या अध्यक्षतेखाली आढाव बैठक संपन्न 





सध्या जगभरात कोरोना ने हाहाकार माजवला असून त्यावर मात  करण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी  मोहोळ तालुक्यातील गावोगावी तसेच ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र सह अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजना व तसेच यापुढे करावयाच्या उपयोजना व घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात शुक्रवार(दि२७)रोजी मोहोळ तहसील कार्यालयात आ.यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढाव बैठक संपन्न झाली. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी साहेब यांनी तालुक्यात करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात माहिती आ.यशवंत माने साहेब यांनी दिली. यावेळी आ.माने साहेब यांनी मोहोळ ग्रामीण रुग्णालय तसेच नजीक पिंपरी येथे शासकीय आश्रमशाळेत करण्यात आलेल्या क्वारंटाइन कक्षेची पाहणी केली व उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधाबदल माहिती घेऊन सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे व बाहेर न पडता आरोग्यविषयक काळजी घेऊन लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनाला हारवुया असे आवाहन आ.यशवंत माने साहेब यांनी मोहोळ मतदारसंघातील नागरिकांना केले.
Reactions

Post a Comment

0 Comments