Ads

Ads Area

आ.शहाजी बापू पाटील देणार मुख्यमंत्री सहायता निधीला एका महिन्यांचे वेतन...

आ.शहाजी बापू पाटील देणार मुख्यमंत्री सहायता निधीला एका महिन्यांचे वेतन...


सांगोला (जगन्नाथ साठे)- : संपूर्ण जगात कोरोना या विषाणू व्हायरसने थैमान घातले असून महाराष्ट्रात ही कोरोनाने शंभरी पार केली आहे. संपूर्ण देश लॉक डाऊन आहे,सर्वत्र संचार बंदी आहे,ही सर्व परिस्थिती पाहता सांगोल्याचे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मार्च महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला  दिले आहे.महाराष्ट्रातील सेनेच्या सर्वच खासदार आणि आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका महिन्याचे वेतन दिले आहे.
       सांगोला तालुक्यात ही शहाजी बापू पाटील यांनी स्वखर्चातून कोरोना जनजागृती साठी दोन स्पिकर  गाडीच्या सहाय्याने संपूर्ण मतदारसंघातील  जनतेला कोरोना रोखण्यासाठी आणि घ्यावयाच्या काळजीबद्दल आवाहन केले आहे.   आरोग्य अधिकारी आणि प्रशासनाकडून दररोज कोरोना संदर्भातील आढावा घेत आहेत. तालुक्यातील जनतेने "मीच माझा रक्षक" या वचनाप्रमाणे शासनाच्या नियमांचे १४ एप्रिल पर्यंत पालन करावे,संचार बंदीच्या काळात पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर यावे,अन्यथा घरात राहून कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे ही शहाजी बापू पाटील यांनी तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close