सांगोला तालुक्यात तिघे होम कॉरंटाईन मध्ये तर सहा हजारांहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी पूर्ण:डॉ.सीमा दोडमणी
सांगोला (जगन्नाथ साठे):- सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, या कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन मध्ये आहे,कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी सांगोला तालुक्यातील परजिल्ह्यातून आलेल्या ६७४७ तर
परदेशातून आणि परराज्यातून आलेल्या १०७ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी कोरोना व्हायरसच्या धर्तीवर पूर्ण झाली असून तालुक्यातील तिघांना होम quarantin करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैदकीय अधिकारी डॉ सीमा दोडमणी यांनी दिली.
कोरोनाचा प्रचार आणि प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न चालू असून काही नागरिकांनी स्वतःहून माहिती द्यावी,असे आवाहन ही डॉ. सीमा दोडमणी यांनी केले आहे. होम quarantine केलेल्या मध्ये कडलास,गळवेवाडी, मेडशिंगी येथील रुग्णाचा समावेश असून त्यांना चौदा दिवस होम कॉरंनटाईन मध्ये राहण्याच्या सक्त सूचना आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात ही लोकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे,आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याच्या आणि कोरोनाच्या संदर्भातील अडचणी सोडविण्यास सक्षम आहे, असे ही डॉ. दोडमणी यांनी सांगितले.
0 Comments