Hot Posts

6/recent/ticker-posts

2515 योजनेतून सांगोल्यातील रस्त्यांसाठी 5.25 कोटी रुपये मंजूर

2515 योजनेतून सांगोल्यातील रस्त्यांसाठी 5.25 कोटी रुपये मंजूर
 -आमदार शहाजीबापू पाटील


 सांगोला (प्रतिनिधी) सन 2019 - 20 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेमधून (2515 योजना) तसेच रस्ते व पूल दुरुस्ती कार्यक्रम योजनेतून (3054 योजना) अनुक्रमे ४ कोटी व १.२५ कोटी असे एकूण ५.२५ कोटी रुपयांचा नवीन रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालयाची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली या दोन्ही योजनेमधून आतापर्यंत सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी मिळालेला हा सर्वाधिक निधी असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली याअगोदर मार्च 2020 अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगोला विधानसभा मतदार संघातील कामासाठी 35.80 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांमधून यावर्षी सुमारे 41 कोटी रुपयांची रस्त्याची कामे सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार आहेत त्याचबरोबर जिल्हा नियोजन विकास समितीमधून व मुख्यमंत्री सडक योजनेमधून तालुक्यातील अनेक नवीन रस्त्यांना अदयाप मंज़ूरी मिळणे बाकी आहे. 2515 योजनेमधून 1 सोळसे दुकान ते केंगार घरापर्यंत डांबरीकरण यलमार मंगेवाडी 20 लक्ष. 2.वझरे रस्ता ते दत्त मंदिर डांबरीकरण वझरे 20 लक्ष. 3. कवले महाराज ते आनंदराव पाटील घर रस्ता डांबरीकरण कडलास 20 लक्ष . 4.बलवडी पाटी ते विकास मोहिते घर रस्ता डांबरीकरण बलवडी 20 लक्ष. 5 भगवान बाबर घर ते मेकले घर रस्ता डांबरीकरण चोपडी 20 लक्ष. 6.सांगोला रोड ते मकाळे वस्ती रस्ता डांबरीकरण चिणके 20 लक्ष. 7 दिवाण मळा ते अजनाळे रस्ता डांबरीकरण अजनाळे 20 लक्ष. 8 मेथवडे फाटा ते मेथवडे गाव रस्ता डांबरीकरण 20 लक्ष. 9.मेडशिंगी ते सांगोला जुना रस्ता डांबरीकरण मेडशिंगी 20 लक्ष.10.राजुरी रोड आबानगर ते कोकरे वस्ती रस्ता डांबरीकरण वाटंबरे 20 लक्ष.11 मोहिते मळा ते डोंगरे वस्ती रस्ता डांबरीकरण तिप्पेहळी 20 लक्ष. 12 नरवडे वस्ती ते भोजलिंग टेक रस्ता डांबरीकरण हलदहिवडी 20 लक्ष. 13 अकोला ते खटकाळे मळा रस्ता डांबरीकरण 20 लक्ष. 14.सांगोला रोड ते देशमुख वस्ती रस्ता डांबरीकरण लोटेवाडी 20 लक्ष. 15.सोनंद घेरडी रस्ता ते राजकुमार बाबर घर रस्ता डांबरीकरण 15 लक्ष. 16 सोनंद जवळा रोड ते कॅप्टन कोळसे घर रस्ता डांबरीकरण 5 लक्ष. 17. सोनल वाडी लिंक रोड ते मोरे वस्ती रस्ता डांबरीकरण एखतपुर 15 लक्ष.18. ज्ञानू केदार ते बाबर मळा रस्ता मुरमीकरण वासुद 10 लक्ष. 19. म्हाकुबाई मंदिर ते संपत आलदर वस्ती रस्ता डांबरीकरण कोळे 20 लक्ष. 20. पाचेगाव ते मिसाळवाडी रस्ता डांबरीकरण पाचेगाव खुर्द 10 लक्ष. 21. चिकमहूद ते थोरला कदम मळा रस्ता डांबरीकरण 30 लक्ष. 22. चिकमहूद ते तामजाई देवस्थान रस्ता डांबरीकरण 20 लक्ष. 3054 योजनेमधील रस्ते 1. सांगोला ते जुना आलेगाव रोड रस्ता डांबरीकरण 28 लक्ष. 2. महुद ते पवारवाडी रस्ता डांबरीकरण 34.38 लक्ष. 3 बलवडी ते नाझरे रस्ता डांबरीकरण 25 लक्ष.4. बंडगरवाडी 2 थोरला कदम मळा रस्ता करणे व मोरी बांधणे चिकमहूद 25 लक्ष.5. महिम - जैनवाडी रस्ता मोरी बांधणे 5 लक्ष. 6. राजुरी मानेगाव रस्ता मोरी बांधणे 5 लक्ष. वरील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच यांचया निविदा काढून कामे सुरू होतील अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments