राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सवास सुरुवात !
सांगोला - श्री संत गाडगेबाबा यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेची प्रतिष्ठापना व पूजन करून जयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा यांची 144 वी जयंती सांगोला येथील परीट गल्ली मध्ये साजरी करण्यात येत असून शुक्रवारी सकाळी दहा वाजता परीट समाजातील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेची प्रतिष्ठापना व पूजा करण्यात आली. त्यानंतर महाशिवरात्रीनिमित्त परीट गल्ली येथे भाविकांना केळीचा प्रसाद वाटप करण्यात आले. तर सायंकाळी श्रीराम महिला भजनी मंडळाचे भजन कार्यक्रम संपन्न झाला. शनिवारी सकाळी नऊ वाजता शहरातील सर्व पुतळ्यांचा परिसर स्वच्छ करण्यात येणार असून या स्वच्छता अभियानात परीट समाज बांधव व अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. तर रविवारी सकाळी पुरुष भजनी मंडळाचे भजन व त्यानंतर दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सचिन शिंदे (पंढरपूर) यांचे राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान आणि त्यानंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला समाज बांधव तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश पाटोळे यांनी केले आहे.
0 Comments