दहावी, बारावी परीक्षा केंद्राच्या परिसरात
कलम 37 (3) लागू
सोलापूर दि. 21 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात दिनांक 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 या कालावधीत बारावी आणि दिनांक 3 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. इयत्ता बारावी व दहावी परीक्षा कालावधीत सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या परीक्षा केंद्र परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून अप्पर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश लागू केले आहेत. दहावी व बारावी परीक्षा केंद्र आणि प्रश्नपत्रिका वितरण केंद्राचे ठिकाणी बेकायदेशीर जमाव करून कॉपी करण्यास मदत करणे, परीक्षा पर्यवेक्षकांना दमदाटी करणे, मारहाण करणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पळविणे वगैरे गैरप्रकारामुळे परीक्षा केंद्राचे ठिकाणी शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिनांक 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 कालावधीत होणाऱ्या बारावी आणि दिनांक 3 मार्च 2020 ते 22 मार्च 2020 कालावधीत होणाऱ्या दहावी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार परीक्षा केंद्रातील 100 मीटर परिसरात सकाळी 9.00 ते सायं.सहा वाजेपर्यंत वा.पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पाच किंवा पाचाहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थीनींना व त्यांना सोडण्यास येणाऱ्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परीक्षक, निरीक्षक शिपाई तसेच शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्ती यांना लागू पडणार नाही.असे अप्पर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.
0 Comments