जवळे गावचे ग्रामदैवत श्री. नारायण देवाची मानाची पूजा युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील यांच्या हस्ते संपन्न
सांगोला /प्रतिनिधी : काशी या तीर्थक्षेत्रानंतर दुसरे महात्म्य असलेले सांगोला तालुक्यातील जवळा येथील श्री. नारायण देव मंदिराचे देवस्थान मानले जात आहे. महाशिवरात्रि निमित्ताने या मंदिरातील देवाच्या मूर्ती च्या पूजेचा मान कायम साळुंखे-पाटील कुटुंबीयांना मिळत आहे. परंपरेनुसार चालू वर्षी म्हणजेच काल शुक्रवार दि. 21 रोजी महाशिवरात्रीनिमित्त युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील यांच्या हस्ते मंदिरातील श्री. नारायणदेव मुर्तिस अभिषेक घालून पूजेचा मान स्वीकारला. साळुंखे-पाटील कुटुंबियांकडून राजकारण हा बरोबर समाजकारण आणि समाजकारण हा बरोबर वारकरी सांप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न आजपर्यंत काळात त्यांनी केला आहे. यामध्ये जवळा तालुका सांगोला येथे ह-भ-प श्रीमती शारदादेवी साळुंखे-पाटील (काकींनी ) वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. जवळा गावात वारकरी सांप्रदायविषयी आपुलकी निर्माण करून गेल्या अनेक वर्षापासून ह-भ-प श्रीमती शारदादेवी साळुंखे-पाटील यांनी महाशिवरात्रीनिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण परंपरा सुरू ठेवली आहे. जवळा गावचे ग्रामदैवत श्री. नारायणदेव हे काशीनंतर महात्म्य असलेले दुसऱे दैवत मानले जात आहे. जवळा येथील श्री. नारायण देवाची ओळख व महात्म्य खूप मोठे आहे. महाशिवरात्रीनिमित्त श्री. नारायण देवाची पूजा करण्याचा मान परंपरेने साळुंखे-पाटील कुटुंबाकडे आहे. यावर्षी यशराजे साळुंखे-पाटील यांच्या हस्ते श्री. नारायण देवाच्या मूर्तीस अभिषेक घालून मानाची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जवळे गावातील अनेक भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री. नारायण देवाची पूजा करण्यात आली. त्यानंतर जवळ व परिसरातील भाविक भक्तांनी श्री. नारायण देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी सकाळपासून मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जवळा ग्रामस्थांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता. शुक्रवारी श्री. नारायण देव मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली.
0 Comments