Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजचे खंडणीखोर पोलिसांच्या जाळ्यात

अकलूजचे खंडणीखोर पोलिसांच्या जाळ्यात



अकलूज ( प्रतिनिधी ) अकलूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्यांना दमदाटी करून व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने कपडे घेऊन जाणे, पैशाची मागणी करणे , हप्ते वसुली करणे, सावकारी करणे यासारखे प्रकार काही गुंड करीत आहेत. अशाच खंडणीखोर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती खंडणी व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अकलूज पोलिस ठाण्याकडून देण्यात आली. अकलूज पोलिस ठाण्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिल्ली जीन्स व स्टायलो जीन्स या रेडीमेड कापड दुकानातून सचिन यादव शिंदे वय २८ वर्ष राहणार आंबेडकर नगर अकलूज, संजय विश्वनाथ शिरसागर वय ३२ वर्षे राहणार आझाद चौक अकलूज, शरद उर्फ शेऱ्या दिलीप खरे वय ३१ वर्षे राहणार महादेव नगर अकलूज, अनिल उर्फ सूर्याभाई शहाजी सोनवणे राहणार अकलुज यांनी बऱ्याच वर्षापासून या दुकान मालकास दमदाटी करून महिन्याला दोन ड्रेस घेऊन जात त्याचप्रमाणे दिनांक १५/०२/२०२०  व दिनांक १९/०२/२०२० रोजी त्यांनी ४७०० रुपये किमतीचा माल सदर दुकानातून दुकान मालकास दम देऊन घेऊन गेले.सदरची तक्रार दुकान मालकांनी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे दिली असता त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून सदर आरोपीवर खंडणी व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत निकम विशाल घाडगे, शिवाजी पांढरे अनिल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सूर्यवंशी यांनी वरील आरोपी क्रमांक १ ते ३ यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ पकडून सदर गुन्ह्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक तोरडमल यांनी अटक करून त्यांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांचे पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन पुढील तपास करीत आहेत तर त्यांनी पुन्हा असे प्रकार करु नये म्हणून पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर म्हणाले की घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे.अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील सर्व व्यापारी व नागरिकांना पोलिस निरीक्षक यांचे आवाहन आहे की आपले कपड्याचे दुकान, मोबाइल दुकान, हॉटेल्स लॉज अथवा इतर कोणतेही दुकान किंवा व्यवसाय असेल तेथे येऊन गुंड गुन्हेगार व्याजबटा करणारे सावकार व इतर लोक जबरदस्ती लूटमार करून पैसे हप्ते घेत असतील तर देऊ नका! माझ्याकडे या.. मला माहिती द्या..मी त्या नराधमांना पाहतो! त्यांना सोडणार नाही. त्यांना सोलापूर जिल्ह्यात राहू देणार नाही.कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही मी तुमच्या पाठीशी आहे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल तसेच बेकायदा व्याजबटा करणारे सावकार यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून त्यांच्यावरती लवकरात लवकर मोठी कारवाई केली जाईल. त्यांची गय केली जाणार नाही असे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर म्हणाले.
Reactions

Post a Comment

0 Comments