Hot Posts

6/recent/ticker-posts

संत गाडगेबाबा जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

संत गाडगेबाबा जयंती विविध  धार्मिक  कार्यक्रमांनी साजरी 

सोलापूर .दि.२२(प्रतिनिधी ) पाणीवेस येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली  मंदिरात  संतश्रेष्ठ गाडगेबाबा जयंती विविध  धार्मिक  कार्यक्रमांनी साजरी  करण्यात  आली. प्रारंभी  संत गाडगेबाबा यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण  करण्यात  आले.यानंतर  ह.भ.प.गणेश महाराज  वारे यांचे  किर्तन झाले .आपल्या  किर्तनातून गणेश महाराज  यांनी  महाशिवरात्रीचे महत्त्व  आणि  संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांचे  विचार  मांडून उपस्थित  लोकांची  मने जिंकली,पाणीवेस भजनी मंडळांच्यावतीने भजनसोहळा मोठ्या  भक्तीमय वातावरणात  पार पडला,शेवटी  महप्रसादाचे वाटप करुन  कार्यक्रमाची  सांगता करण्यात  आली.या कार्यक्रमासाठी ह.भ.प.नारायण  क्षिरसागर.उत्तम मोरे.पभुभाऊ मोरे.सोमा जानगवळी. राजू तांदळे.भास्कर  माडीकर.विनोद भोसले.अरुण सोनटक्के.विठ्ठल  ताटवे.संतोष काटकर.सचिन चौगुले. यांच्यासह बहुसंख्य  परीट समाज  बांधव मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते .

Reactions

Post a Comment

0 Comments