Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ माजी आमदार गणपतरावजी देशमुख हे वयाच्या ९४ व्या वर्षी आजही जनतेच्या कामांसाठी अतिशय सक्रिय आहेत.

ज्येष्ठ माजी आमदार गणपतरावजी देशमुख हे वयाच्या ९४ व्या वर्षी आजही जनतेच्या कामांसाठी अतिशय सक्रिय आहेत.



ज्येष्ठ माजी आमदार गणपतरावजी देशमुख हे वयाच्या ९४ व्या वर्षी आजही जनतेच्या कामांसाठी अतिशय सक्रिय आहेत. आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी त्यांच्या मतदार संघातील काही प्रलंबित कामासंदर्भात माझी शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे भेट घेतली. त्यांनी या भेटदरम्यान त्यांचे प्रश्न निवेदना मार्फत मला दिले. त्यावर चर्चा करण्याबाबत जिल्हाधिकारी, सोलापूर यांना दुपारी १.३० ची वेळ दिली. या चर्चेसाठी सबंधित अधिकारी यांनाही बोलवणेबाबत सांगितले. मी वेळेच्या थोडा आधीच जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पोहोचलो. तर देशमुख साहेब माझ्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते. त्यांनी मांडलेला प्रश्नही सर्वसामान्य जनतेशी निगडित. पहिला सांगोले तालुक्यातील अचकदानी ते बेंदवस्ती हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर रस्ता वनविभागाने काम अडवल्याने रखडला आहे व दुसरा विषय सांगोला कालव्याची व वितरण व्यवस्थेची कामे बंदिस्त नलिकीद्वारे करणे. त्यांची या प्रश्नांबाबतची तळमळ व अभ्यासपूर्ण मांडणी पाहता संबधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या. आदरणीय माजी आमदार गणपतरावजी देशमुख यांची जनसामान्यांसाठी असणारी तळमळ काम करण्याची उमेद देते. दिलीप वळसे पाटील

Reactions

Post a Comment

0 Comments