Hot Posts

6/recent/ticker-posts

'हिरवळ' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

'हिरवळकाव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन 




सोलापूर :- उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल गणपत डांगे हिच्या 'हिरवळ' या काव्यसंग्रहाचे ज्येष्ठ कवि माधव पवार यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ कवि राजेंद्र भोसले, विद्या अक्कलकोटे, उळे गावचे सरपंच सुरेश डांगे, सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक माने, गणपत डांगे, प्राचार्य सुकुमार मोहोळे, उपप्राचार्या, सुनिता बशेट्टी, पर्यवेक्षिका अश्विनी पंडीत तसेच उळे गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा थाटात पार पडला. यावेळी राजेंद्र भोसले यांनी स्नेहलच्या कवितांचे कौतुक करुन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर कुंडलिक माने यांनीही रोख रक्कम देऊन तिचे कौतुक केले .स्नेहल हिने आपले मनोगत व्यक्त करताना काव्यसंग्रहासाठी ज्यांनी प्रोत्साहन दिले त्यांचे आभार मानले तसेच आई-वडिल व महाविद्यालयातील शिक्षकांनी केलेल्या संस्काराच्या मुशीतूनच आपण घडलो त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींच्या सहकार्यामुळेही हा काव्यसंग्रह लिहिला गेला असे सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पवार यांनी या सोहळ्याप्रसंगी अतिशय लहान वयामध्ये हा काव्यसंग्रह प्रकाशित करणारी कवयित्री म्हणून स्नेहलला शाबासकीची थाप देऊन भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ज्वलंत प्रश्नांवरील हृदयस्पर्शी कविता अशा शब्दांत काव्यसंग्रहाची प्रशंसा केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुकुमार मोहोळे यांनी केले. मान्यवरांची ओळख गणेश लेंगरे यांनी करुन दिली. तर कार्यक्रमाचे आभार कल्याणप्पा हायगोंडे यांनी केली. तर सूत्रसंचालन अर्चना कानडे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास महाविद्यालयातील विलास लेंगरे,  अशोक म्हमाणे, कल्पना रोकडे,  प्रतिभा कंगळे, अविनाश मुळकुटकर, सोमनाथ राऊत, जगदेवी माळी आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनी उपस्थित होत्या.    

Reactions

Post a Comment

0 Comments