सहयाद्री फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेत घवघवीत यश
सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी, ता. बार्शी येथे झालेल्या राज्यस्तरीय
पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. औषधनिर्माणशास्त्र संबंधित
विविध विषयावर पोस्टर व मॉडेल सादरीकरण करण्यात आले. सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी
महाविद्यालयाचे बी. फार्मसी तृतीय वर्षाचे विद्यार्थी संध्याराणी बापूसाहेब
गाजरे, स्मिता आप्पासो नवले, प्रदिपकुमार महादेव बनसोडे यांनी
पोस्टर सादरीकरण स्पर्धेमध्ये द्वितिय क्रमांक पटकावला. त्यानी फायटोकेमिकल
इव्हॅलुएशन ऍ़ण्ड ऍ़न्टिकॅन्सर ऍ़क्टीव्हीटी ऑफ फ्रुट ऍक्स्ट्रॅक्शन ऑफ कॅप्यारस
मुनी या विषयावर पोस्टर सादर करुन उत्तमप्रकारे माहिती सांगितली. त्यामुळे
परिक्षकांनी त्याचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयातील द्वितिय व तृतीय बी. फार्म
वर्षाचे इतर विद्यार्थ्यांनी सुध्दा औषधनिर्माणशास्त्र संबंधित विविध विषयावर
पोस्टर सादर केले. महाविद्यालयाच्या जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.
या विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. व्ही. हिरवे मॅडम यांचे
मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्रा. एस. एस. काळे, प्रा. एन. एन. माळी, पी. डी.
पाटील यांनीही सहभाग दर्शविला. या त्याच्या यशाबद्दल संस्थेचे
संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले सर, डॉ. मनोजकुमार पाटील व इतर शिक्षक व
शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी त्यांना
शुभेच्छा दिल्या.
0 Comments