जुळे सोलापूर संस्कृतिक मंडळाचा पोलीस आयुक्त यांनी केला गौरव.
जुळे सोलापूर शिव जन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाचे विविध उपक्रमाची दखल घेऊन सोलापूर चे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व त्या मंडळाच्या आदर्श घेऊन सोलापुरातील शिवजन्मोत्सव मंडळांनी असे उपक्रम राबवावेत असे मत व्यक्त केले. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती धर्मांना व बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली रयतेचे राज्य निर्माण केले हाच धागा पकडून जुळे सोलापूर शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाने विविध जाती धर्मातील तरुणांना घेऊन जुळे सोलापूर शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली आणि या मंडळात अठरापगड जाती धर्मातील युवकांना उत्सव पदाधिकारी नेमले. तसेच महिला ना पण मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे गोविंद श्री मंगल कार्यालय समोरील मैदानात विविध जाती धर्माच्या धर्मगुरू च्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली या मंडळाने मिरवणुकीस फाटा देऊन पर्यावरणावर भर दिलेला आहे. हार तुरे फटाके यावर अनावश्यक खर्च टाळून प्रमुख पाहुण्यांना वृक्षाचे रोप भेट देण्यात येते. महिला समिती च्या वतीने हिंगनघाट व सोलापूर येथील महिलावरील अत्याचारचा निषेध करण्यात आला होता बार्शी येथील शिव व्याख्याते प्राध्यापक विशाल गरड यांचे व्याख्यानाचे आयोजन आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मध्ये विविध जाती धर्मातील महिला बालगोपाळांचा सहभाग होता पारंपारिक वेशभूषा मध्ये महिलांनी फेटे बांधून व हातात भगवे ध्वज घेऊन शिवरायांचा जयघोष करत शिस्तबद्ध पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकोणीस तारखेला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांवर विविध प्रसंगाचे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करीत आले होते त्यामध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्रातील लोककला भारुड या गार्गी काळे यांच्या समाज प्रबोधनासाठि भारुडाचा कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे तसेच सर्व जाती धर्मातील महिलांना घेऊन बाल शिवबाच्या पाळणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला आहे त्यानंतर खास महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंडळाच्या वतीने उत्कृष्ट मंडळ उत्कृष्ट सजावट सती मंडळांना पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहे. या विविध उपक्रमाची माननीय पोलीस उपायुक्त अंकुश शिंदे यांनी या मंडळाचा गौरव केला त्याबद्दल मंडळाच्यावतीने मान्य पोलीस आयुक्तांचे व पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.जुळे सोलापूर शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळ चे संस्थापक श्याम कदम संस्थापक मार्गदर्शक हेमंत पिंगळे, विजापूर नाका पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे उत्सव अध्यक्ष रवी व्हनकुळे, संकेत किल्लेदार ,अनिल कोकाटे , महेश देवकर श्याम कदम अनिकेत कुलकर्णी ,चेतन चौधरी , आनंद पाटील, संदीप कुलकर्णी ,प्रभाकर पडळकर जयतीर्थ पडगानुर, महिला मंडळ अनीता जगदाळे श्वेता व्हनमाने सविता गंभीरे संपदा जोशी मनीषा नलावडे
0 Comments