विज्ञान दिनी झाली शाळा विज्ञानमय विद्यार्थ्यांनी टाकला विविध शास्त्रज्ञांवर प्रकाशझोत सोलापूर
डॉ. सी. वी. रमन यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दिनाचे औचित्य साधून सुरवसे प्रशाला सोलापूर येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान प्रशालेतील मधील विद्यार्थी शिराज मुजावर याने फॉस्फरसची तोफ व शिवशंकर व्हनमाने याने स्वतः बनवलेले रिमोट कंट्रोलड विमान यांचे प्रात्येक्षिक दाखवले. या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी होत्या प्राचार्या उज्वला ताई साळुंखे, प्रमुख पाहुण्या अपर्णाताई रस्ते, पर्यवेक्षिका गितांजलीताई पीरगोंडे, पालकवर्गातून निलेश व्हनमाने व ज्येष्ठ शिक्षिका वासंती माळवदे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञानातील गमती जमती सांगत विज्ञानाची महती पटवून दिली. तर अध्यक्षीय भाषणात आपण रोजच्या जीवनात विज्ञान व त्याचा उपयोग, श्रद्धा व अंधश्रद्धा या गोष्टी अधोरेखित केल्या. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लोंढे मॅडम, सज्जन मॅडम, करंजकर मॅडम यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा बिराजदार हिने केले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments