बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन
अकलूज ( प्रतिनिधि ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री तथा माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अकलूज येथील मार्केट कमिटीच्या वतीने बांधण्यात येणार्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे लाङके नेते माजी उपमुख्यमंत्री, माजी खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती मदनसिंह मोहिते पाटील उपसभापती मामा पांढरे, संचालक बाबाराजे देशमुख, चंद्रकांत मगर , बाळासाहेब सरगर, सचिव राजेंद्र काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments