कुटूंब व्यवस्था सांभाळयाची असेल तर शिक्षण आणि संस्कार या दोन घटना महत्त्वाच्या होतं - युवराज पाटील
मराठा समाज सेवा मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेत चला कुटूंब जपूया या विषयावर बोलताना ताण तणाव सहन करण्याची ताकद ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कष्टाची जाणीव, संस्कृतीची जाणीव नसणारे त्याला शिक्षण म्हणता येणार नाही. आपण कोणत्या संस्काराचे वारसदार आहोत हे आपणास समजले पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत त्यांच्या विचारधारेवर आपण वाटचाल केली पाहिजे. तरच आपली कुटूंब व्यवस्था टिकेल असे ते म्हणाले. साहित्यात फारमोठी शक्ती आहे. साहित्यातून बहिणाबाई चौधरी यांनी मानव जातीचे गीत गाईले. भावना या विकत मिळत नाहीत त्यासाठी चांगल्या मुल्यांची गरज असते. आपण आपले स्वत: सिंहावलोकन करा, आजूबाजूला चांगले वाईट काय आहे हे बघायला पाहिजे. पुढे बोलताना कुटूंब व्यवस्थेची विदारक स्थिती मांडताना ते म्हणाले की, बेजबाबदार स्वातंत्र्य हे घातक आहे. पण लोक तेच घ्यायला तयार झाले आहेत. व्यक्ती केंद्राकडे त्याचा कल गेल्याला दिसतो. विभक्त कुटुंब हे होण आपण अपरिहार्य मानले तर ते आपल्यासाठी घातक आहे. विभक्त कुटूंबामुळे गावगाडा उद्ध्वस्त झाला, गावे ओस पडू लागली हे आपल्या समाजासाठी चिंताजनक बाब आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जीवन विमा योजना, मानसिक रूग्नालये ही विभक्त कुटुंबामुळे समाजात निर्माण झाली. ऑनलाईनच्या माध्यमातून जर आपण बोलत असू तर एकेदिवशी आपले नेटवर्क संपलेले असेल. प्रगतीच्या नावाखाली आपण जर जगण्याची मुल्ये बदलत चाललो तर आपल्या मनातील भिंतीचे काय होणार हा खरा प्रश्न आहे. आपल्या चौफेर भाषणातुन पुढे ते म्हणाले की, शहरे वाढली तशी इमारतींची उंची वाढली. भौतिक गोष्टींचर उंची वाढली पण आपल्यातील माणूसपण हारवत चालले आहे ही गंभीर बाब आहे. आजची विवाहसंस्था कमकुवत झाली असल्याने ३० टक्क्यांनी घटस्फोटाची प्रकरणे वाढली आहे ही भीषण वास्तवता आहे. जसा चुलीमध्ये निखारा असतो तो पर्यंत त्याची किंमत असते. त्याला बाहेर काढल्यानंतर तो कोळसा होतो. तसे नात्याचेही आहे. त्यामुळे संवेदनशिलतेचे मुल्य आपण जपले पाहिजे. पाश्चामात्यांचे अनुकरण वाढल्याने आपल्याकडे विभक्त कुटूंब पद्धत वाढली आहे. आज संवादच बंद झाले आहेत. आपल्यातील संवाद वाढला तर आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनोहर सपाटे, निवृत्ती केत, शहाजी सुर्वेगुरुजी, मोहन गोरे, विजया पाटील, कल्पना पवार, सुजाता जुगदार, मंगला भातुलके, डॉ. अनिल बारबोले, डॉ. मधुकर पवार, नागनाथ नवगिरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा परिचय विनायकराव पाटील यांनी करून दिला तर आभार नामदेव थोरात यांनी मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संभूदेव गावडे यांनी केले.
0 Comments