श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेली ६८ लिंगाची माहिती आता मराठी विकिपीडियावर - प्रा. अरविंद बगले
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रा. अरविंद धरेप्पा बगले यांनी सोलापुरातील श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेली ६८ लिंगाची नावे, लिंगाची स्थाने, लिंगाची फोटो सहित ही माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध करून दिली आहे. श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेली ६८ लिंगे व शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर सोलापूर या नावाने मराठी विकिपीडियामध्ये शोध करून ह्या २ स्वतंत्र लेख मध्ये ६८ लिंगाची माहिती घेऊ शकता. ह्या वर्षी प्रा. अरविंद बगले यांनी सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वराची गड्डा यात्रा वेळी संपूर्ण यात्रा मध्ये १८०० फोटो काढलेले आहेत. यामध्ये ७०० फोटो हे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर, श्री रेवणसिध्देश्वर मंदिर, ६८ लिंग यांचे फोटो काढले आहेत. यासाठी प्रा. अरविंद बगले यांनी ४५,००० रुपयेचे निकॉन डी ३५०० डीएसएलआर हे कॅमेरा विकत घेतले. हे सर्व फोटो कॉपीराईट क्रिएटिव्ह कॉमन्स मार्फत सर्वाना वापरण्यास कॉपीराईट मुक्त केले आहेत. लवकरच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांची अद्यावत माहिती व गड्डा यात्रा मधील ११०० फोटो मराठी विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे. त्यांच्या या कार्यामुळे श्री सिद्धरामेश्वर देवस्थान पंचकमिटी व सोलापूर शहर व जिल्ह्यातील लोकाकडून अभिनंदन केले जात आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी श्री सिद्धरामेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी सोलापुरातील सी.ए. नागप्पा शेटे व त्यांचे वडील सिध्देश्वर शेटे, अरविंद बगले यांची पत्नी स्मिता बगले व मुलगी ईश्वरी बगले या सर्वांचे सहकार्य मिळाले. विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी व युवकांनी सतत संपादन करायला हवे अशी माहिती प्रा. अरविंद बगले यांनी दिली.
प्रा.अरविंद बगले
प्रा.अरविंद बगले
0 Comments