मुलांना मराठीची गोडी लागण्यासाठी पालकांकडू न प्रयत्न आवश्यक -प्रा. हनुमंत मते
सोलापूर दि.27:- मुलांना
मराठी भाषेची गोडी
लागण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न
करायला हवेत, असे मराठी
भाषेचे प्राध्यापक हनुमंत मते
यांनी आज येथे
सांगितले. मराठी भाषा गौरव
दिनानिमित्त आज एस.
टी. बस स्थानक
येथे कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता.
या कार्यक्रमात ते
बोलत होते. यावेळी
विभाग नियंत्रक रमाकांत
गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी
रवींद्र राऊत, यंत्र अभियंता
दत्तात्रय चिकोर्डे आगार व्यवस्थापक
सुधाकर कुलकर्णी , कामगार अधिकारी
प्रदीप सुतार, उपयंत्र अभियंता
उत्तम जोंधळे आदी
उपस्थित होते. यावेळी लोकराज्यच्या
मराठी भाषा विशेषांकाचे
प्रकाशन करण्यात आले. प्रा.
मते म्हणाले, मराठी
भाषा अतिशय समृध्द
भाषा आहे. मराठी
भाषेतील म्हणी, वाक्यप्रचार, लोकगीते,
ओव्या, पाळणा गीते, लोककला
अशा विविध क्षेत्रांतील उत्तम उत्तम दालन
अधिक समृध्द झाले
आहे. मराठी
भाषेचा प्रत्येकाला अभिमान हवा.
मात्र अलिकडे इंग्रजी
भाषेतील शिक्षणामुळे घरात आई-वडील आणि
मुले यांच्यात इंग्रजी
भाषेत संवाद होतेा.
हा संवाद मराठी
भाषेतून व्हायला हवा पुर्वी
आजी, आजोबा नातवांशी मराठी भाषेतून
संवाद करीत असत.
मात्र आजकाल मुलांशी
मराठी भाषेतून संवाद
कमी होतेा. पालकांनी
मुलांशी मराठी भाषेतून संस्कार
करायला हवा. मराठी
भाषेची गोडी लागण्यासाठी
प्रयत्न करायला हवा असे
प्रा.मते यांनी
सांगितले. सोलापूर शहर बहुभाषक आहे.
येथे मराठी बरोबरच
उर्दु, तेलगु, कन्नड, गुजरात
आदी भाषा
बोलल्या जातात. मराठीचा अभिमान
बाळगतानाच या भाषांचाही
सन्मान, आदर करायला
हवा, असे प्रा.
मते यांनी सांगितले.
0 Comments