Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवजयंती लोकोत्सव व्हावा - प्रशांत पाटील

शिवजयंती लोकोत्सव व्हावा - प्रशांत पाटील 


सोलापूर प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इतर सणाप्रमाणे घराघरांमध्ये साजरी व्हावी या शिवजयंतीला लोकोत्सव प्राप्त व्हावे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले.  मराठा सेवा संघाच्या वतीने 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत आयोजित छत्रपती महोत्सव उपक्रमाअंतर्गत तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाच्या वतीने रविवारी पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पत्रकारांचा गौरव करण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशांत पाटील बोलत होते यावेळी विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अमोल शिंदे ,बी आर न्यूज चे प्रमुख मनीष केत ,वृत् दर्पणचे प्रमुख पांडुरंग सुरवसे ,अस्मिता न्युजच्या संपादक  अस्मिता गायकवाड मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक दत्ता मुळे दैनिक सुराज्य  चे संपादक राजकुमार  नरूटे सेवा संघाचे शहराध्यक्ष सदाशिव पवार तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराजा आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी कार्यक्रमाची भूमिका आपल्या  प्रास्ताविक भाषणातून विशद केली  यावेळी मार्गदर्शन करताना सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास  बखरकारांनी आणि चुकीच्या पद्धतीने लिहिला तो खरा इतिहास मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. 19 फेब्रुवारी  ला शिवजयंती उत्सव साजरा करावा यासाठी सेवा संघाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नाला यश आले, आता शिवजयंती घराघरांमध्ये साजरी करून  शिवजयंती लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा  उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात  यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित नगरसेवक अमोल शिंदे  मनीष केत  अस्मिता गायकवाड दत्ता  मुळे  यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली पुरस्कार प्राप्त स्वराज्याचे राजकुमार नरोटे राकेश कदम अपर्णा गव्हाणे यांनी सत्कारास उत्तर देऊन आपले मनोगत व्यक्त केले. तर पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून समाजामध्ये विविध उपक्रम राबवणाऱ्या आणि पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा विशेष गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केलं तर आभार कल्याण गव्हाणे यांनी मानले. 
Reactions

Post a Comment

0 Comments