Hot Posts

6/recent/ticker-posts

सरस जीवनाकडे वाटचाल करायची असेल तर मानव धर्म श्रेष्ठ होय. - डॉ. सुनिल धापटे


सरस जीवनाकडे वाटचाल करायची असेल तर मानव धर्म श्रेष्ठ होय. - डॉ. सुनिल धापटे

मराठा समाज सेवा मंडल आयोजित शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेत सरस जीवनाचा राजपथ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. मोहन गोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नीतीमुल्यांची संस्कार हे आपल्या मनातून निर्माण झाली पाहिजेत, जे चांगले काम करतात त्यांचे कौतूक झाले पाहिजे. सरल जीवनाकडे वाटचाल करायची असेल तर मानसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे, आपल्यातील मुल्य जर चांगली असतील तर आपले जीवन खंगले आहे. म्हणून आपणास उजळणी करायची आहे, जीवनाच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगात आपण हारवत चाललो आहोत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपण आपले स्वतःचे आयुष्य जगत नाही. आपण इतरांशी तुलना करून त्यांच्या सारखे जगण्याचे प्रयत्न करतो. त्यामुळे जीवनाची ओढाताण होते. आपण इतरांचा विचार न करता आपण आपले स्वत:चे आयुष्य आनंदाने जगले पाहिजे. मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांच्यावर अधिकार लादण्यापेक्षा त्यांच्या कलेनुसार त्याला वाव दिला पाहिजे. त्यांना मार्गदर्शन करणे हा आपला हेतू असला पाहिजे. मुलांमधील वेगळेपण आपणास शोधता आले पाहिजे. मुलांनी थोरा मोठ्यांचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. त्यानुसार नीतीमुल्यांची जपणूक करायची आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मुल्यावर आधारित वर्तन म्हणजे नैतिकता होय आणि त्यातून त्या नैतिकतेतून आयुष्य सुलभ होत जाते. जगण्याची उर्मी ही आपणास स्वप्नांच्या माध्यमातून मिळते. प्रत्येकाने काहीतरी ध्येयाने पेटून उठले पाहिजे की त्यातून आपणास आनंद मिळाला पाहिजे. आपल्या आनंदामध्ये इतरांना सामावून घेतले पाहिजे. म्हणजे आपण इतरांसाठी काही तरी केले पाहिजे. आपली माणसे ही खुप महत्त्वाची असतात. आपल्या माणसांची काळजी घेण्यात समाधान आहे. शेवटी बोलताना ते म्हणाले की, माणूस सगळ्यात समाधानी कधी होतो असा सर्व्हे चालू आहे. त्या सर्व्हेमधून आलेले निष्कर्ष असे आले आहेत की, आपल्या माणसाबरोबर राहणे यात समाधान मिळते. आपल्याकडे जी माहिती आहे, जे ज्ञान आहे ते इतरांना सांगण्याने होते. या व्याख्यानमालेस प्रा. महेश माने, हणमंतु बेसुळके, नामदेव थोरात, शहाजी सुर्वे गुरुजी, उषा गोकळे, महानंदा सोलापूरे, संजीवनी मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. जगन्नाथ पांढरे यांनी केले तर आभार डॉ. युवराज सुरवसे यांनी मानले. 


Reactions

Post a Comment

0 Comments