महाराज आम्ही चालवू
पुढे हा वारसा
१४ व १५ फेब्रुवारी शिवाजी विदयापीठ गणितशास्त्र विभागातर्फ आयोजीत केलेल्या एका सेमीनारसाठी कोल्हापूरात होतो. १५ तारखेला सांयकाळी ५.३० वा. कार्यशाळा झाल्यानंतर रात्री ११.३० ची रेल्वे होती. तोपर्यत काहीतरी टाईम-पास करावा, या उद्देशाने महेश सरांसोबत राजारामपुरीत आलो. तासभर थोडीशी खरेदी केली व चौकशी केल्यावर नवव्या गल्लीत जेवणासाठी छान हॉटेल आहे असे कळाले. तिथे आल्यावर एका लहान मुलाला त्या हॉटेलचा पत्ता विचारल्यावर, त्याने चला मी दाखवितो असे अगदी प्रेमाने सांगीतले. मी म्हटलं मला फक्त लांबूनच दाखव. माझा आणखीन एक मित्र येतोय. मग आम्ही जाऊ. तोपर्यत समोरच्या दुकानातून त्याचा ५-६ छोटया मुला-मुलींचा एक ग्रुप तिथे आला. चौकशी केल्यावर कळाले की, ते शिव-जयंतीची वर्गणी गोळा करत होते. मी म्हणाली मी पण १0रु वर्गणी देईन, पण कुणीतरी एकाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कमीत कमी पाच वाक्य माहीती सांगायची. लगेच एक चिमुरडी मुलगी म्हणाली, मला महाराजांविषयी माहिती नाही पण मी महाराजांविषयी एक स्लोगन म्हणेन व तिने म्हटले “अंधार फार झाला आता दिवा पाहीजे, या देशाला जिजाऊचा शिवबा पाहीजे. लगेच दुस-या एका मुलाने महाराजांचा पोवाडा म्हणून दाखविला. आणखीन एकाने महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाल्याचे सांगीतले. मी लगेचच वर्गणीसाठी पाकीट उघडले, पण त्यात सुटे पैसे नव्हते, तर ५00 ची नोट होती. मी म्हणालो २ मि. थांबा. माझा मित्र येतोय, मग मी तुम्हाला २०रु. देईन. त्यावर लगेच एकजण म्हणाला त्या समोरच्या दुकानात चिल्लर मिळेल की. मी लगेच समोर गेली . पण मला चिल्लर मिळाली नाही. सर्व चमू पाठीमागेच होता. मुलांना पाहून दुकानदार किर्लोसर यांच्या तो सर्व प्रकार लक्षात आला व त्यांनी मला चिल्लर दिली. मी मुलांचा उत्साह पाहून त्यांना ५०रू. दिले. यावर एक पोर म्हणालं, आम्हाला फक्त्त १0रु. च दया. आम्ही त्यापेक्षा जास्त कुणाकडून घेत नाही. त्याच्याबरोबर सर्व ग्रुपने तीच सुर आवळला. मी थक्क झालो. मी तरीही ५0रु. त्याच्या हातात ठेवले पण लगेच तो म्हणाला थांबा मी चिल्लर आणतो. सगळा गृप बाजूच्या चायनीज हॉटेलात गेला व त्या चिल्लरमधून १0रू घेऊण, बाकीचे ४०रु. त्या सर्वानी मला परत केले. मी आवाकच झालो. त्या गुपमध्ये कोणही ७-८ वर्षापेक्षा जास्त नसेल पण किती ती समज. मी त्यांना शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळवण्याचे अवाहन केले व महाराजांचे विचार आचरणात आनण्यास सांगीतले. एक दिवस नक्कीच तुम्ही महाराजांसारखो व्हाल. असे म्हटल्यावर पुन्हा एकजण म्हणाला, तुमचा फोन नंबर मला दया. आम्ही माहिती मिळवून तुम्हाला फोन करु. एकाहून एक असे मला आश्चर्याचे धक्के बसत होते . खरच काय वय होतं त्या मुलांच, पण किती ती समज. एका बाजूला आपण म्हणतो लहान मुलं मोबाईल वेडी झालीत. त्यांचा मोठयांबद्दलचा आदर कमी होत चाललाय. ती भावनाशुन्य व संस्कारहीन होत चाललीत . पण खरच या प्रंसगाने माझं आर्तमन अगदी भारावून गेलं. खरच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अजूनही या मातीत जिवंत आहेत व ते युगेनयुगे असेच राहतील याची साक्षच जणू या मुलांनी दिली. आणी हीच बाल व तरुणपिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा नक्कीच पुढे चालवेल याची खात्री पटली. चला तर मग, आज आपण सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा करूयात की, या शिवजयंतीला शिवजी महाराजांचे किमान एकतरी पुस्तक वाचून त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. महाराजांचे विचार आचरणात आणुयात. तेव्हाच र्खया अर्थाने शिवजयंती साजरी होईल आणि हाच महाराजांना आपल्या तर्फ मानाचा मुजरा राहील. बोला “छपती शिवाजी महाराज की जय”. "जय भवानी जय शिवाजी".
0 Comments