स्वप्नील डेव्हलपर्सचे अमोल सोनकवडे यांना सात लाखाच्या चेक बॉऊन्स प्रकरणी न्यायालयाकडुन अटक वॉरंट जारी
सोलापुर :- आरोपी मे. स्वप्नील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अमोल जयप्रकाश सोनकवडे वय ३७ वर्षे, चंदा यापार, रा. हुतात्मा स्मृती मंदिर गाळा नं. २६, पार्क चौक, सोलापुर यांच्याविरुद्ध न्यायालयानध्ये में कोटानी समन्स बजावल्यावर आरोपी जाणुनबुजुन गैरहजर राहिल्यामुळे व मे. कोर्ट हुकुमाचे पालन नाही केल्याने फौजदारी कोर्टाचे न्यायाधीश कु. जाहेदा मिस्त्री नॅडम यांनी आरोपी अमोल सोनकवडे यांच्या विरुद्ध अटक वॉरंटचा आदेश एस टी सी केस नं. ११९८/२०१७ याकामी संबंधित पोलिस स्टेशनला आदेश केलेला आहे. यात हकिकत अशी की, फिर्यादी मोनाप्पा चांगो गोजगेकर, वय:- ४० वर्षे, रा. दत्त नगर, सोलापुर यांनी आरोपी अमोल सोनकवडे यांच्या कडुन सलगरवाडी येथील आयर्न पॅराडाईज या ओपन प्लॉट स्कीम मधील प्लॉट नं. ११९ सदरचे प्लॉट आरोपी कडुन सात लाखास विकत घेतलेली होती. परंतु फिर्यादीच नावांची नोंद ७/१२ उताऱ्यावर होत नसल्यामुळे फिर्यादी व आरोपी मधील खरेदी व्यवहार रद्द करुन आरोपी अमोल सोनकवडे यांनी फिर्यादी मोनाप्पा गोजगेकर यांना सात लाखाचा चेक सोलापुर जनता सहकारी बँकेचा शाखा रेल्वे लाईन चेक कं चेक दिलेला होता. व सदरचा चेक बॉऊन्स झाल्यामुळे फिर्यादी मोनाप्पा गोजगेकर यांनी अॅड.
श्रीनिवास कटकुर व अॅड. किरण कटकुर यांच्यामार्फत सोलापुर येथील मे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट न्यायाधिश कु. ११९८/२०१७ कु. जाहेदा मिस्त्री मॅडम यांच्या कोर्टात फौजदारी खटला क्रं. ११९८/२०१७ दि निगोशिएबल इंस्टुमेंट अक्ट १३८, आयपीसी कलम ४२० कलमान्वये आरोपी अमोल सोनकवडे विरुध्द केस दाखल केली. व याकामी मे. कोर्टानी आरोपीस मे. कोर्टात हजर राहण्याचा आरोपीस आदेश केला असता आरोपीने मे. कोर्टात जाणुनबुजुन हजर राहण्याचे टाळल्यामुळे मे. कोर्टानी आरोपी अमोल जयप्रकाश सोनकवडे यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचा आदेश संबंधित पोलिस स्टेशन यांना आदेश केलेला आहे. व याकामी फिर्यादी मोनाप्पा गोजगेकर यांच्या तर्फे ॲङ श्रीनिवास कटकुर व अॅड किरण कटकुर यांनी काम पाहत आहेत. आरोपी तर्फे इस्माईल शेख यांनी काम पाहत आहेत.
0 Comments