सांगोला तालुक्याचे नीरा- कालव्याचे पाणी एक लिटर सुद्धा कमी होऊ देणार नाही-- आ. शहाजीबापू पाटील.
नीरा देवधर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारे पाणी नीरा उजवा कालवा आणि डाव्या कालव्याच्या माध्यमातून लाभ क्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे. त्यामुळे बारामतीचे वळवलेले पाणी पुन्हा बारामतीला मिळणार आहे,त्यामुळे नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील खंडाळा, फलटण,माळशिरस,पंढरपूर सांगोला तालुक्याच्या लाभ क्षेत्राला नुकसान होणार आहे अशी काही शेतकऱ्यांना भीतीवाटत आहे .त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे. सांगोला तालुक्याचे हक्काचे नीरा- कालव्याचे चे पाणी एक लिटर सुद्धा कमी होऊ देणार नसल्याचे मत सांगोला विधानसभेचे आमदार एडवोकेट शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की काल जो मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे तो अधिकृतरित्या माझ्याकडे आलेला नाही व कालच्या बैठकीमधील जीआर पाहण्यात येईल तो पाहिल्यानंतर त्यावर स्पष्ट बोलता येईल, त्यामुळे सांगोला तालुक्याला मिळणार हक्काचं पाणी एक लिटर सुद्धा कमी करता येणार नाही व ते कमी होऊ देणार नाही कायद्यानुसार हक्काचं पाणी संपूर्ण घेणार आहे कायदेशीर तरतूद करून ते घेणार आहे त्यामुळे आमचे नेते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी बोलून चर्चा करणार आहे या बाबतीत मुख्यमंत्री साहेब सांगोला तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाहीत असा ठाम विश्वास मला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया आ. शहाजीबापू पाटील यांनी दिली
0 Comments