सांगोला येथे मोरनी कलेक्शन या कापड दुकानाचा उद्घाटन समारंभ संपन्न .
सांगोला (प्रतिनिधी) (जगन्नाथ साठे) -- सांगोला शहरातील जय भवानी चौक येथे नव्यानेच सुरु झालेल्या मोरनी कलेक्शन या कापड दुकानाचा भव्य उद्घाटन समारंभ अविनाश गवळी आणि रमेश देवासी या उभयतांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने मोरनी कलेक्शन या कापड दुकानाच्या उद्घाटन समारंभास भेट देऊन गवळी आणि देवासी यांना शुभेच्छा दिल्या. नव्याने सुरू झालेल्या या कापड दुकानांमध्ये सर्व प्रकारच्या साड्या तसेच लहान मुला-मुलींची कपडे तसेच डोअर व विंडो पडदे, सोलापुरी चादर, सतरंजी लग्न बस्त्यासाठी विशेष सोय करण्यात आली असून होलसेल दरात सर्व प्रकारच्या कपड्याची विक्री केली जाईल,असेही गवळी आणि देवासी यांनी सांगितले.विविध प्रकारच्या व्हरायटी या दुकानात उपलब्ध असून सांगोला वासीयांना एकवेळ अवश्य भेट द्यावे असेही आवाहन गवळी आणि देवासी यांनी केले आहे. या वेळी सुरेश देवासी,भरत देवासी,लक्ष्मण देवासी तसेच गवळी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
0 Comments