Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाची इयत्ता दुसरीची क्षेत्रभेट संपन्न

सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाची इयत्ता दुसरीची क्षेत्रभेट संपन्न 


सांगोला (प्रतिनिधी) ;- सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयातील इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांची शालेय उपक्रमातर्गत कमलापूर एमआयडीसी येथे क्षेत्रभेट उत्साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी एमआयडीसीमधील पाण्याची/ दुधाची टाक्या बनवण्याचा कारखाना,गादी तयार करण्याचा कारखाना, कॅरेट बनवण्याचा कारखाना, कात्रण बनविण्याचा कारखाना,बॉक्स बनविण्याचा कारखाना विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. यावेळी या तिन्ही कारखान्याला भेट दिल्यानंतर संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापकाने या लघु उद्योगाची परिपूर्ण आणि उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. सदर क्षेत्रभेटी साठी एमआयडीसी कमलापूर चे चेअरमन अशांक चांदणे तसेच भारत नवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी प्रसिद्ध बासरीवादक समाधान काटे यांनी आपल्या बासरीवादनातून बालगीते,देशभक्तीपर गीते,विविध प्रार्थना ,भावगीते यांच्या धून वाजवून दाखविल्या.सदर बासरीवादनास विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. सदर क्षेत्रभेट पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख जगन्नाथ साठे, नानासाहेब घाडगे,मनिषा बुंजकर,मनिषा वाघमोडे, ज्योती मेंढापुरे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments