Hot Posts

6/recent/ticker-posts

गँगरेप तपास सीबीआयकडे द्या मातंग समाजाचा उद्या मोर्चा

गँगरेप तपास सीबीआयकडे द्या मातंग समाजाचा उद्या मोर्चा




सोलापूर - (दि.२०) सोलापूरात अल्पवयीन विद्यार्थीनीवर झालेल्या गँगरेप प्रकरणात स्थानिक पोलीसांचा तपास निराशजनक आहे. हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा. यासह इतर मागण्यांसाठी मातंग समाज सोलापूर शहरच्यावतीनं उद्या शुक्रवार दि. २१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी दिली. हा मोर्चा भैय्या चौकातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून सकाळी ११.३० वाजता निघणार आहे. पोलीसांनी या प्रकरणात १० आरोपी असल्याचं आधी सांगितलं. प्रत्यक्षात ११ आरोपी निघाले. त्यातील ५ जणांनाच अटक केली आहे. पिडीत मुलीनं १६ जणांची नावं सांगितली आहेत. पोलीस आरोपींची नावं जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत हे सारं संशयास्पद आहे असंही खंदारे म्हणाले. तपास सीबीआयकडून व्हावा, निष्णांत बकील सरकारनं मुलीच्या बाजूनं द्यावेत. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मुलीच्या कुटुंबाचं दुसऱ्या शहरात पुनर्वसन करावं अशा मागण्याही समाजाच्या आहेत. पत्रकार परिषदेस युवराज पवार, सुरेश पाटोळे, गोविंद कांबळे, विजय पोटफोडे, समाधान आवळे, बाळासाहेब वाघमारे, लखन गायकवाड, महादेव भोसले, राजू क्षीरसागर, हिरा अडगळे आदी उपस्थित होते.   
Reactions

Post a Comment

0 Comments