Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या हातावर मोफत टॅटू काढून विद्यार्थ्यांमध्ये केले देशप्रेम जागृत.

विद्यार्थ्यांच्या हातावर मोफत टॅटू काढून विद्यार्थ्यांमध्ये केले

देशप्रेम जागृत.




सोलापूर २६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताकदिनी आनंद आणि देशप्रेम प्रकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो. या सर्व कार्यक्रमांत आपण मोठया उत्साहाने सहभागी होतो. तिरंगी मंडप, तिरंगी पताका अशी सजावट सर्वत्र केलेली दिसते. मात्र, बहुतेकदा सजावटीची ही साधने प्लास्टिकपासून बनलेली असतात, खरे तर प्रजासत्ताक दिनाच्या आठवडाभर आधीपासूनच दुकानांमध्ये, विशेषत: सिग्नलवरील विक्रेत्यांकडे प्लास्टिकपासून बनलेले लहान मोठे भारतीय तिरंगी झेंडे विकायला सुरुवात होते. आपल्यापैकी बरेच जण ते झेंडे विकत घेतात व प्रजासत्ताक दिनापर्यंत, चार-पाच दिवस आपण झेंडा गाडीमध्ये वा घरी घेवून मिरवतो खरे, पण नंतर या झेंडयांचे रूपांत प्लास्टिकच्या कचऱ्यात होते व आपल्या तिरंग्याचे ही अवमान होते. हे प्लास्टिक प्रदूषण व राष्ट्रीय अवमान रोखण्यासाठी सोलापूर येथील उत्तर कसबा मधील कैकाडी गल्लीत राहणाऱ्या द फाईन आर्ट टॅटू चे संस्थापक श्री राहुल माने यांनी प्लास्टिकच्या झेंड्याला फाटा देत विद्यार्थ्यांच्या हातावर मोफत टॅटू काढून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत केले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या हातावर जय हिंद, तिरंगा, लव यू इंडिया, विविध वंदे मातरम् ,जय भारत, इत्यादींचे गोंधण(टॅटू) करून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामध्ये सहाशे विद्यार्थ्यांच्या हातावर विविध टॅटूचे गोंदन केले. या अभिनव उपक्रमाला त्यांचे बंधू तथा बिनभिंतीच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष गणेश माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुंडलिक तोडमे रवी सुतकर,सिधू हिरेमठ तसेच दशभुजा गणपती मंडळाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे व राहूल माने याचे सर्वच क्षेत्रातून कौतूक होत आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments