पापय्या तालीम संघात
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सोलापूर :- पापय्या तालीम संघाच्यावतीने जुनी मिल कंपौड येथील ऐतिहासिक पापय्या तालीमच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन भव्य व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाअध्यक्ष मा.श्री. उमेश पवार यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. शांतीकुमार घोडके यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालीमीचे जेष्ठ पैलवान व संस्थापक चंद्रकांत कदम, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, उपाध्यक्ष जयंत मोरे, सेक्रेटरी शिवाजी चटके, जॉ.सेक्रेटरी गणेश कुलकर्णी खजिनदार गजानन लामकाने सदस्य प्रदीप शिर्के, यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रकाश सुरवसे, सुर्यकांत भगत, प्रकाश कदम अनिल इंगळे, अमोल जाधव, अतुल कोथिंबीरे, रणजीत खताळ, राजकुमार माचकनूर, रणजीत घोडके, गणपत माने, श्रीनिवास कोठे, विष्णूपंत जाधव, राजू नकाते, व्यायामपटू, कुस्तीपटू, क्रीडाप्रेमी, परिसरातील लहान मुले बहुसंख्येने उपस्थित होते. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे जयंत मोरे, सुत्र संचालन वसंत कुलकर्णी तर आभार प्रदर्शन प्रदीप शिर्के यांनी केले.

0 Comments