Hot Posts

6/recent/ticker-posts

पापय्या तालीम संघ आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर उत्साहात संपन्न

पापय्या तालीम संघ आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर उत्साहात संपन्न


सोलापूर दिनांक २६.०१.२०२० रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पापय्या तालीम संघाच्यावतीने जुनी मिल कंपौड येथील ऐतिहासिक पापय्या तालमीच्या प्रांगणात संस्थेने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.०० ते ४.०० या वेळेत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर भव्य प्रमाणात उत्साही वातावरणात यशस्वीरित्या पार पाडले. शिबीरात स्त्री-१५०, पुरूष-१३२ असे एकूण २८२ प्रौढ, जेष्ठ, गरजू नागरीकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून लाभ घेतला. विशेषत: महिलांचा सहभाग उल्लेखनिय होता. सदर शिबीराचे उद्घाटन सोलापूर रेल्वे स्टेशन उपप्रबंधक मा.श्री.संजय अर्धापुरे यांचे हस्ते व अॅड. व सामाजिक कार्यकर्त्या मा.विलीना लांडगे यांचे अध्यक्षतेखाली, संस्थेचे जेष्ठ पैलवान व संस्थापक मा.श्री.चंद्रकांत कदम तसेच संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे यांच्या उपस्थित पार पडले. शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ.सुप्रिया खांडेकर डॉ सुमैय्या शेख तसेच शारदा आय केअर सेंटरचे प्रोप्रा. विकास गुंड, गणेश बुंड, यांनी मोफत सलग नेत्र तपासणी केली यावेळी संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पापय्या तालीम संघाचे संस्थापक पै.चंद्रकांत कदम, विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, सेक्रेटरी शिवाजी चटके, जॉ.सेक्रेटरी गणेश कुलकर्णी, खजिनदार गजानन लामकाने, विश्वस्त प्रदीप शिर्के, विजय पाटील, सभासद प्रकाश पवार, किरण बायस, लक्ष्मण भगत, प्रकाश सुरवसे, लक्ष्मण भोसले, लक्ष्मण डोंगरे, राजू शिंदे, अजित शिंदे, बंडू कदम, विनायक झिंगाडे, स्वप्नील बांदीवडेकर, अनिल टेलर, रणजीत खताळ, श्रीनिवास कोठे, विष्णूपंत जाधव, शंकर लिखे इत्यादींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन संस्थेचे गणेश कुलकर्णी व आभार प्रदर्शनप्रदीप शिर्के यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments