Hot Posts

6/recent/ticker-posts

रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा



स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन भैय्या सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक  उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.सामाजिक चळवळीतील कर्तुत्वान युवक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे  स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन भैया सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  स्वाभिमानी ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य व रोहन सुरवसे पाटील मित्र मंडळ, मैत्री प्रतिष्ठान अकलूज यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून २३ जानेवारी रोजी अकलूज येथील राऊत मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून रोहन सुरवसे पाटील  यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अकलूज  येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मैत्री प्रतिष्ठान अकलूज  यांच्या वतीने शालेय साहित्य व खाऊ वाटपकरण्यात आले तसेच पुणे येथील नवरत्न वृद्धाश्रमात खाद्यपदार्थ व  उपयोगी विविध वस्तू भेट देण्यात आल्या.यावेळी दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अण्णासाहेब सुरवसे, नितीन जाधव, राजाभाऊ जाधव, नवनाथ काशीद, श्रीनाथ सुरवसे, तात्या खटके, विकी काशीद, गफ्फार शेख, रोहन कुदळे विठ्ठल बोडके, सुरज मंडवळे, बाळासाहेब सुरवसे, हनुमंत आबा सुरवसे ,विजू भाऊ जाधव, भैय्यासाहेब पोळ, तुषार  ननवरे, अनिल भैय्या सुरवसे, विक्रम कारंडे,सचिन श्रीनामे, बाबासाहेब वाघमोडे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments