Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठी विद्यालय, बार्शी येथे 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मराठी विद्यालय, बार्शी येथे 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

         

मराठी विद्यालय, बार्शी येथे 71वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  उदयकुमार उत्तमराव पोतदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .कार्यक्रमासाठी नगरसेविका भागीरथीताई त्रिंबके , बार्शी उपविभागीय डाक अधिकारी अमितजी बाळासाहेब देशमुख , शाळेचे अध्यक्ष  अमोल सुलाखे सर , संचालिका प्रा.डाॅ.अबोली सुलाखे मॅडम , मुख्याध्यापिका श्रीमती संगिता बडवे मॅडम इत्यादींची मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .विद्यार्थ्यांची भाषणे , देशभक्तीपर गीते व महापुरुषांच्या वेशभूषा करण्यात आल्या. तसेच शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा  संगीत साथ देऊन काही देशभक्तीपर गीते सादर केली.
         प्रमुख पाहुणे  उदयकुमारजी यांनी विद्यार्थ्यांना बालपणापासूनच काही ना काही छंद जोपासना करावी असे मार्गदर्शन केले.21देशांची नाणी , 41देशांची पोस्ट तिकीटे, काडीपेटींवरील चित्रांचा संग्रह करून टाकाऊ मधून टिकाऊ बनविलेले ग्रिटींग कार्ड यांचे प्रदर्शन भरविण्यात आले .प्रदर्शनाचे उदघाटन  भागीरथीताई त्रिंबके यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments