Hot Posts

6/recent/ticker-posts

करमाळ्यात सीटर कम स्लीपर ही बससेवा नव्याने सुरू.


करमाळ्यात सीटर कम स्लीपर ही बससेवा नव्याने सुरू.



राज्य परिवहन करमाळा आगारातुन रातराणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या   करमाळा - मुंबई या मार्गावर महामंडळाने विना वातानुकूलित आसनी शयानयान (सीटर कम स्लीपर) ही बससेवा नव्याने सुरू केली आहे. या बसचे उदघाटन करमाळ्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळेसाहेब यांनी केले.यावेळी त्यांनी बसची पाहणी केली.याप्रसंगी आगारव्यवस्थापक अश्विनी किरगत,वाहतूक निरीक्षक  कुलकर्णी, दैन, अभिजित पाटील , केंगार, सरडे, कोकनी, बिनवडे  फसले  माकूडे पाथ्रूडकर  कुंभार हे उपस्थित होते.
दररोज रात्री सात वाजता ही बस करमाळा येथून सुटेल व पहाटे पाच वाजता मुंबई येथे पोहोचेल. तसेच मुंबईहून ही बस रात्री 9.45 वाजता सुटेल व करमाळा येथे सकाळी 6.30 वाजता पोहोचेल.
या सीटर कम स्लीपर बस ची सीटर  आसनक्षमता तीस इतकी असून स्लीपर ची आसनक्षमता पंधरा इतकी आहे.या बस चा सिटिंग आणि स्लीपर साठीचा तिकीटदर सारखाच असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने स्लीपर ची सुविधा देण्यात येईल.ही बस रिझर्व्हेशन साठी देखील उपलब्ध आहे.
महामंडळाने रात्री करमाळा- मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली सोय केली असून रात्री बसेस धावणाऱ्या इतर मार्गावर देखील महामंडळाने अशी सोय करावी,असे मत पो. नि.  पाडुळे यांनी मांडले.
करमाळा आगारात या बसेस नव्याने दाखल झाल्या असून त्या मुंबई मार्गावर चालवण्यात येणार आहेत.प्रवाशी प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी बसेस वाढवण्यात येतील.तसेच अशा नव्यानव्या बसेस सुरू करून महामंडळ कात टाकत आहे व प्रवाशांना नव्या सुविधा उपलब्ध करून देत आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारव्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments