सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
सांगोला (प्रतिनिधी);-स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या समाजसुधारक,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनी प्रतिनिधी सानिका चौगुले हिच्या आणि इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थिनींच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन सर्वत्र बालिका दिन "म्हणून साजरा करण्यात येतो.या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती मनिषा वाघमोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली लिगाडे मॅडम यांनी केले तर आभार स्नेहलता बाबर मॅडम यांनी मानले.
सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे व उत्सव प्रमुख शुभांगी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0 Comments