सोपल इंग्लीश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व सुकन्या समृध्दी योजनेची कार्यशाळा संपन्न
बार्शी प्रतिनिधी - बार्शी येथील स्व.शोभाताई सोपल इंग्लीश स्कूल येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हॉल मध्ये क्रांतीज्योती व पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालिका दिन व स्त्री-मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे पांगरी पोलिस स्टेशनच्या सौ. शारदा सानप यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील सावित्रीच्या वेशभुषेतील लेकींणी भाषणे केली. तसेच भारत सरकारच्या पोस्टाची सुकन्या समृध्दी योजने बद्दल बार्शी पोस्ट विभागाचे अधिकारी अमित देशमुख यांनी माहिती दिली. १० वर्षाच्या आतील मुलींसाठी ही योजना फायदेशीर असून पोस्ट कार्यालयात पालकांना फॉर्म भरुन नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सानप बोलताना म्हणाल्या की क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेऊन स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणाबरोबरच इतर सर्व बाबींमध्ये स्त्रियांना समान हक्क मिळावा व त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिले. महिलांसाठी त्यांनी दिलेल्या मोठया योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस जागतिक बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणूनही देशभरामध्ये साजरा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थाध्यक्ष विनायक गरड, पोस्ट विभागाचे अधिकारी अमित देशमुख, पांगरी पोलिस स्टेशनच्या शारदा सानप, पांगरीचे पोस्ट मास्तर अमोल भताने,मुख्याध्यापिका प्रिती अवसारे व शिक्षिका आदींसह पालकवर्ग, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

0 Comments