मुलाचा वाढदिवस रक्तदान करून साजरा
बार्शी :- बार्शी येथील दत्त प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री.युवराज गोवर्धन जगताप व त्यांची अर्धांगिनी सौ.प्रमिला युवराज जगताप ( शिक्षिका जि. प.कन्या माणकेश्वर)
या दाम्पत्याने त्यांचा धाकटा मुलगा चि. ऋतुराज युवराज जगताप याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला . बार्शी येथील श्रीमान राम भाई शहा रक्तपेढीत युवराज जगताप व भगवंत रक्तपेढीत त्यांच्या अर्धांगिनी प्रमिला जगताप यांनी दि :- ०३/०१/२०२०रोजी या पती पत्नी शिक्षक दाम्पत्याने रक्तदान करून मुलाचा वाढदिवस साजरा करून त्यास शुभेच्छा दिल्या .रक्त दानाचे कार्य खूप पवित्र कार्य असून समाजातील प्रत्येक घटकांनी रक्तदान करावे हा संदेश समाजात जावा व सामाजिक बांधिलकी सर्वांनी जपावी ही तळमळ या शिक्षक दाम्पत्याच्या कृतीतून दिसून येते या दोघांनी स्वतःचे व मुलांचे वाढदिवस रक्तदान करून साजरे करण्याचे ठरवले असून आजपर्यंत दोघांचे मिळून ३९ वेळा रक्तदान झाले आहे व पुढील काळात जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत रक्तदान करण्या चे त्यांनी ठरवले आहे.
0 Comments