बहुचर्चित रझा अकादमीच्या नेत्यांसह २०० मुस्लिमांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 24, 2020

बहुचर्चित रझा अकादमीच्या नेत्यांसह २०० मुस्लिमांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

बहुचर्चित रझा अकादमीच्या नेत्यांसह २०० मुस्लिमांनी घेतली 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट


मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या वादावर मुंबईतील २०० मुस्लीम नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. पोलीस आयुक्तालयात ही भेट झाली. यावेळी या नेत्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे निषेध व्यक्त केला. ज्याप्रकारे पंजाब आणि केरळ सरकारने सीएएविरोधात कायदा पारित केला तशाप्रकारे महाराष्ट्रातही हा कायदा लागू करु नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी कोणालाही हा देश सोडून जाण्याची गरज नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना दिलं.  यावेळी बोलताना पोलीस आयुक्त संजय बर्वे म्हणाले की, प्रत्येकाला आपला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण एकाकडूनही कायदा सुव्यवस्था बिघडेल अशाप्रकारचे कृत्य अपेक्षित नाही. तर रझा अकादमीचे सय्यद नुरी यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यामध्ये आम्ही सीएए आणि एनआरसी या कायद्याविरोधातील आमच्या भावना मांडल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही सगळे देशाचे नागरिक आहोत. आपलं नागरिकत्व हटवण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे कोणालाही देश सोडण्याची गरज नाही असं ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages