Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ पंचायत समिती व तहसील कामकाजाचा घेतला आढावा ........

मोहोळ पंचायत समिती व तहसील कामकाजाचा घेतला आढावा ........
   


  आमदार यशवंत माने नूतन सभापती रत्नमाला ताई पोतदार उपसभापती अशोक सरवदे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील गटनेते ज्ञानेश्वर माऊली चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे मानाजी बापु माने  महिला अध्यक्ष व प.स सदस्य  सिंधूताई वाघमारे दिपक माळी  गटविकास अधिकारी येळे यांचे सह सर्व विभागाचे अधिकारी ग्रामसेवक विस्तार अधिकारी यांचे उपस्थित पार पडली.
     गटविकास अधिकारी येळे यांनी पंचायत समितीतील विविध विभागातील अधिकाऱ्यांची ओळख करून दिल्यानंतर विविध विकास कामांची ची माहिती व "आपला गाव आपला विकास" आराखडा विषयी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती दिली
   यावेळी बोलताना आमदार यशवंत माने यांनी सर्व ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांना आपण सर्व ग्रामीण भागातील  शेतकऱ्यांची मुले आहात आपल्या  गावामध्ये वेळेवर उपस्थित राहत जनतेची कामे तातडीने मार्गी लावण्याचे सूचना केली तसेच विकास कामाबद्दल रस्ते बांधकाम आधीचा दर्जा राखणे विषयी सक्त सूचना केल्या.
तहसील ऑफीस बैठक......
      तहसील ऑफिस मध्ये प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व तलाठी,मंडळाधिकारी व तहसील ऑफिसमधील क्लार्क ,नायब तहसीलदार यांचेसह आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,मानाजी बापू माने,दिपक माळी,रमेश बारस्कर प्रशांत बचुटे आदीसह बैठक घेण्यात आली.
   या बैठकीमध्ये पिक विमा अवकाळी दुष्काळी नुकसानीचे  पंचनामे तसेच प्रधानमंत्री सन्मान योजना याविषयी आढावा घेण्यात आला विधानसभा निवडणूक प्रचार व विजयानंतर आभार दौऱ्यामध्ये मोहोळ तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांचे विषयी शेतकरी यांनी माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने लोकनेते चेअरमन बाळराजे पाटील यांचेकडे केल्या होत्या याविषयी आमदार माने यांनी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना विनंतीवजा सूचना केली आपण आपल्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आडी अडचणी तातडीने सोडवाव्यात अशाच ना केल्या यावेळी प्रांताधिकारी ढोले साहेबांनी महात्मा फुले कर्ज माफी योजना व प्रधानमंत्री सन्मान योजना विषयी तलाठ्यांना मार्गदर्शन करून शेतकरी  कोणत्याही कारणास्तव लाभापासून वंचित राहता कामा नये अशी सक्त ताकीद दिली.
    यानंतर पंढरपूर मोहोळ पालखी मार्ग जाणाऱ्या पेनुर खवणी,सारोळे  व पोखरापूर  या गावातील भूमिसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या  तक्रारीचे निवारण करून त्यांना योग्य तो मोबदला  देण्यात यावाअशी सूचना आमदार माने यांनी यावेळी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments