Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रयास फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन

प्रयास फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन








लऊळ:(कालीदास जानराव)लऊळ ता.माढा येथील श्री कूर्मदास विद्यामंदिर लऊळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांना एक दिवसाचे करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुखध्यापक श्री. टाळके सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराचे मार्गदर्शक विठ्ठल देवकर यांनी साध्या आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विदयार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून त्या विषयात करियर करावे.विठ्ठल देवकर पुढे बोलताना म्हणाले जिद्द आणि कष्ट करण्याची जर तयारी असेल तर यश हे नक्की मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी नेहमी कष्टाची तयारी ठेवावी.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक सुनील नलवडे,प्रयास फौंडेशनचे अध्यक्ष विष्णू नलवडे,पंकज चव्हाण, विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गरदडे सर यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments