Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा महाविद्यालयात विशेष व्याख्यान संपन्न

माढा महाविद्यालयात विशेष व्याख्यान संपन्न 





माढा प्रतिनिधी : माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये नुकतेच डॉ. रमेश शिंदे यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी मराठी भाषेचा तंत्रज्ञानातील वापर या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करून भाषेचा प्रभावी वापर रोजगार निर्मितीसाठी करावा अशी त्यांनी माहिती दिली. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर आणि कला व वाणिज्य महाविद्यालय माढा यांच्यामधील सामंजस्य करार या अंतर्गत विशेष व्याख्यान पार पडले. या व्याख्यानाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभागप्रमुख डॉ.एस पी पैकेकरी यांनी केले. या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय मनोगत डॉ. प्रतापकुमार उबाळे यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन डॉ. सुशील शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.एन व्ही शिंदे यांनी केले. या व्याख्यानासाठी प्राध्यापक डॉक्टर सतीश घाडगे प्राध्यापिका पाटील मॅडम प्राध्यापिका एमएम तांबोळी उपस्थित होते यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. एस आर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाने केले होते.
Reactions

Post a Comment

0 Comments