सांगोला पंचायत समितीच्या सभापती पदी शेकाप च्या राणीताई कोळवले तर उपसभापती पदी तानाजी चंदनशिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सांगोला (जगन्नाथ साठे) सांगोला पंचायत समितीची स्थापना १९६५ रोजी झाली असून पुढील अडीच वर्षाच्या कालावधी साठी ही निवड झाली आहे.राष्ट्रवादी दोन,शिवसेना चार तर शेकाप आठ असे पक्षीय बलाबल असलेल्या पंचायत समिती सांगोला मध्ये बिनविरोध निवड झाल्याने शेकाप च्या गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी माजी आमदार गणपतराव देशमुख,माजी सभापती मायाक्का यमगर,माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी सभापती श्रुतिका लवटे,मार्केट कमिटी चेअरमन गिरीश गंगधडे,माजी जि.प.स.किसन माने,पंचायत समिती सदस्य नारायण जगताप,मार्केट कमिटी व्हाइस चेअरमन विलास देशमुख,पंचायत समिती सदस्य दिगंबर शिंगाडे,माजी उपसभापती संतोष देवकते, ऍड धनंजय मेटकरी, मायाप्पा यमगर,प्रा हणमंत कोळवले,प्रा कोकरे,हरिभाऊ पुकळे,माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र कोळेकर,पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर,विनायक कुलकर्णी,कुंडलिक कुंडलिक आलदर आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार गणपतराव देशमुख म्हणाले की,नूतन सभापती कोळवले,आणि उपसभापती चंदनशिवे यांचे अभिनंदन करून आमदार शहाजी बापू पाटील,माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यानी बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.पंचायत समितीच्या आतापर्यंत झालेल्या सभापतींच्या कार्याचा गौरव करून.या पुढील काळात घरकुल योजना,पोषण आहार योजना, समाजकल्याण च्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य करा, गेल्या अडीच वर्षातील कामकाज ही महत्वपूर्ण असल्याचे सांगून गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना विश्वासात घेवून सांगोला तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.
या वेळी नूतन सभापती राणीताई कोळवले म्हणाल्या की येणाऱ्या काळात प्रामाणिक पणाने सर्व जनतेची सेवा करणार आहे,सर्वच घटकांना विकासाच्या बाबतीत सामावून घेणार आहे. तळागाळापर्यंत पंचायत समितीच्या सर्व योजना पोहचविण्याचे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगून शेकापच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
तर उपसभापती तानाजी चंदनशिवे म्हणाले की,माझी उपसभापती पदी निवड केल्याबद्दल आबासाहेबाचे आभार मानून येणाऱ्या काळात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या वेळी माजी सभापती श्रुतिका लवटे,बाळासाहेब काटकर, माजी सभापती मायाकका यमगर,माजी उपसभापती संतोष देवकते,आदिनी मनोगते व्यक्त केली.
या वेळी शेकाप पक्षाचे विविध पदाधिकारी, विविध गावचे सरपंच,उपसरपंच उपस्थित होते.
0 Comments