Hot Posts

6/recent/ticker-posts

गौडगांव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन

गौडगांव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन  





बार्शी प्रतिनिधी -गौडगांव येथे सोमवारी बार्शी - तुळजापूर या मुख्य रस्तावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.बार्शी तालुक्यात दुष्काळ पडल्याने सन २०१८-१९ या वर्षासाठी शासनाकडून दोन हेक्टर ची मर्यादा घालून हेक्टरी ६ हजार ८०० रु दुष्काळी मदत जाहीर केली होती, अजून पर्यंत बार्शी तालुक्यातील सुमारे ४३०३६ हजार शेतकऱ्यांना आनुदान मिळालेले नाही,मात्र सन २०१८-१९ हे वर्षे ओलांडून देखील अध्यापही या अनुदानापासून शेतकरी वंचितच आहेत, त्यामुळे सदर दुष्काळा अनुदान त्वरित देण्यात यावे  या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
      याबाबत या पुर्वी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी बार्शी तहसील कार्यालय येथे उपोषण करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी दुष्काळ अनुदान वितरित केल्यानंतर वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वाटप करण्यात येईल अशा आशाचे लेखी आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना या अनुदानाविषयी नुसतीच प्रतीक्षा करावी लागत आहे.बार्शी तालुक्यात दुष्काळ निधी पात्र शेतकऱ्यांची संख्या साधारण ८८ हजार ११४ एवढी असून अद्यापर्यंत ३८ कोटी 56 लाख ९७ हजार एवढा निधी देखील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे, पण उर्वरित ४३०३६ हजार शेतकऱ्या करता ३९ कोटी ५१ लाख ७३ हजार ८० रुपये निधीची मागणी केल्याची माहिती मंडळ अधिकारी तांबोळी महमंद हनिफ यांनी लेखी पत्र रस्ता रोको आंदोलन करता वेळी दिले त्या वेळी अरुण सुगावकर पोलिस निरीक्षक वैराग , वाघमारे टी. एस तलाठी उपस्थित होते.
          बार्शी तालुक्यातील दुष्काळ अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळावा या मागणीसाठी गौडगांव येथे १ तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
        या वेळी मराठा सेवा संघाचे माजी प्रदेश अध्यक्ष नेताजी गोरे, माजी सभापती लक्ष्मण संकपाळ, सरपंच संगमनेर समाधान सावंत, माजी सरपंच भालगांव श्यामसुंदर जाधवर, माजी सरपंच रऊळगांव विनायक भोसले, काकासाहेब भड , भास्कर काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
       यावेळी प्रमुख उपस्थिती बालाजी गाटे सरपंच सारोळा, सचिन बुरगुटे सरपंच उपळे, बालाजी भोंग सरपंच बोरगांव,  सुधाकर मंडलिक माजी सरपंच भांडेगाव, युवराज गंभीरे कासारी, अमर घुगे आळजापूर, अनिल लाटे मिर्झनपूर, बालाजी घोडके रूई, लता यादव नांदणी, विष्णू पवार पांगरी, नागेश काजळे , सतिश यादव , सुरेश आरगडे आदी ३० ते ३५ गावातून शेतकरी रस्ता रोको आंदोलनास उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments