Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवनेरी पब्लिक स्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

शिवनेरी पब्लिक स्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन


बार्शी प्रतिनिधी - वारदवाडी चौक उपळाई ठोंगे येथील शिवनेरी पब्लिक स्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन कोअर कमिटीचे संचालक उद्योजक रामभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यासाठी अभ्यासाबरोबर विविध प्रकारचे खेळ प्रकार अवगत असणे तितकेच गरजेचे आहे. शारीरिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी, आरोग्यसंपन्न राहाण्यासाठी, शिस्तबद्ध व संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यासाठी अश्या प्रकारच्या क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या क्रीडा सप्ताहामध्ये धावणे, लांब उडी, कबड्डी, खो-खो, कराटे, बॉक्सिंग, कुस्ती,  योगासन, जिम्नॅस्टिक्स, रोपक्लायमिंग, रायफल शूटिंग, लाठी-काठी,  सॅकरेस, फ्रॉगजंप, चमचा लिंबू, संगीत खुर्ची आदी प्रकारचे क्रीडा प्रकार व स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे संस्थाध्यक्ष धिरज शेळके यांनी दिली. यावेळी संस्थेच्या संचालिका मोनिका शेळके, महेश ठोंगे, धनाजी वळेकर, प्राचार्या अंजली घोटाळे, जयश्री जडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक महेश मुळे, प्रियंका माळी, प्रतिभा नवले, गीतांजली देवकते, पूजा चोबे,  विठ्ठल जगताप, आश्राब ठोंगे, महेश चोबे, धनंजय कोळी, मीरा कोळी आदींनी विशेष परिश्रम घेत आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments