Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न..

माढा महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न..





माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्यासाठी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आज पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित राहिले. यांचे प्रास्ताविक व स्वाग  प्रा.अशोक लोंढे यांनी केले प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी महाविद्यालयाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील वाटचालीची माहिती दिली. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी परिचय सत्रात महाविद्यालयाच्या विकासामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.  कार्यक्रमाच्या अनौपचारिक स्वरूपामुळे महाविद्यालयाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने आपली मते व्यक्त केली आणि महाविद्यालयाचे विकासाबाबत काय करता येईल त्याबद्दलच्याआपल्या सूचनाही सांगितल्या. मदतीचा हात पुढे करून महाविद्यालयाच्या विकासामध्ये सक्रिय होण्याच्या प्राचार्यांच्या आवाहनामुळे काही माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक स्वरूपात तर काहींनी वस्तू स्वरूपात देणगी जाहीर केली. काही माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक कायमस्वरुपी ठेव देण्याचेही मान्य केले.
या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटना बळकट करून महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्यासाठी सक्रिय राहण्याबाबतचे नियोजन केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. सदाशिव कदम यांनी महाविद्यालयाचा विकास करण्यासाठी सक्रिय मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. आभारप्रदर्शन अॅड विशाल सक्री यांनी केले तर सूत्रसंचालन  डी  व्ही चवरे, जे एम पालकर यांनी  केले. या मेळाव्यास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा प्रकाश ताकभाते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments