जिजाऊ जन्मोत्सव, १२ जानेवारी, सिंदखेड राजा...
--- काही सूचना व विनंती..
पुणे. दिनांक २६-१२-२०१९..
नेहमीप्रमाणे यावर्षीही आपण महागर्दीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी १२ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे येणार आहात. आपले सहर्ष स्वागत आहे. रविवार आहे. त्यामुळे काही लोक शनिवारी येणार आहेत असे सांगितले जाते. हरकत नाही..
++ मित्रांनो, दरवर्षी गर्दी वाढत आहे. तसेच पोलिस यंत्रणा बंदोबस्तात वाढ करत आहेत. बाहेरच्या गाड्या मेहेकर दुसरबिड कडून येणाऱ्या वाहनांना सिंदखेडराजा नगर पालिका कार्यालयाजवळ मोती तलाव कडे जाणार्या रस्त्यावर फाटा येथे थांबवले जाते. तर देऊळगाव राजा कडून येणाऱ्या वाहनांना जिजाऊ सृष्टी कडे जाणार्या रस्त्यावर टि पॉईंट येथे थांबवले जाते. जालना कडून येणाऱ्या वाहनांना मोती तलाव येथे थांबवले जाते. अनेकदा सोबत मुले व वयस्कर ज्येष्ठ महिला पुरुष असतात. एवढ्या दूर अंतरावरून त्यांना जिजाऊ सृष्टी कडे पायी चालत जाणे वेदनादायी व अडचणीचे होते. याबाबत पोलिस यंत्रणा हतबल होऊन पाहत असते...
++ मित्रांनो, मला आपणास कळवितांना आनंद होतो की यावर्षी १२ जानेवारी २०२० रोजी आपणास या त्रासापासून मुक्ती मिळेल असे वाटते. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला येथील अधीक्षक अभियंता इंजि गिरीश जोशी साहेब यांचे कानावर जिजाऊ भक्तांची ही अडचण गेली होती. त्यांनी स्वत: लक्ष्य घालून काय पर्याय देता येईल यासाठी सर्व परिसराची पाहणी केली. आणि दुसरबीड रोड फाटा ते मोती तलाव कडे जाणार्या रस्त्यावर दुरुस्ती करून रस्ता डांबरीकरण करण्यासाठी आदेशही दिले आहेत. तरी दुसरबीड कडून येणाऱ्या वाहनांना जिजाऊ सृष्टी कडे जाण्यासाठी मोती तलाव मार्गे जाता येईल. त्यांनी हाच रस्ता वापरायचा आहे. तसेच देऊळगाव राजा रोड वरील टि पॉईंट येथून जिजाऊ सृष्टी कडे जाताना तेथेच उजव्या बाजूला एक कमान आहे. तो कच्चा रस्ता पुढे दर्गाकडे जातो. इंजि गिरीश जोशी साहेब यांनी हा एक नवीन रस्ता तयार करून दिला आहे. हा रस्ता पुढे जिजाऊ सृष्टी जवळ पार्किंग मध्ये पोचतो व मोठ्या जालना रस्त्यास जोडलेला आहे. हा सर्व रस्ता १२ जानेवारी पूर्वी डांबरी होईल असे नियोजन केले आहे.. तरी टि पॉईंट येथून जिजाऊ सृष्टी कडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा ही विनंती. आपल्या सोयीसाठी या तिन्ही ठिकाणी टि पॉईंट, मोती तलाव व दुसरबीड रोड फाटा येथे माहिती फलक लावण्यात येणार आहेत.. या सोयीमुळे जास्तीत जास्त लोकांना सहज जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे पोचता येईल असे वाटते.
++ मित्रांनो , या निमित्ताने माझी आपणास नम्र विनंती आहे की कृपया आपण या सुविधेचा वापर करावा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य करावे. आपल्या सर्व मित्रांना कळवा, ग्रुपवर पाठवा , शेअर करा व जमल्यास वर्तमान पत्र बातमी देणे..
++ मित्रांनो, मा इंजि गिरीश जोशी साहेब यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणेही बहुतेक त्यांना आवडत नाही. आवडणार नाही. पण या निमित्ताने मला आज सांगताना खूप आनंद व अभिमान वाटतो की आज आपल्याला दिसत असणारी जिजाऊ सृष्टी उभारण्यात इंजि गिरीश जोशी साहेब यांचा मोलाचा वाटा आहे. अशा मायाळू व उत्साही साहेबांचा वरदहस्त लाभलेला असल्याने त्यांच्या स्थानिक सहकारी अभियंता मित्रांनी अल्पकाळात हे सर्व काम हाती घेतले व जवळपास संपत आणले आहे. कार्यकारी अभियंता इंजि चंद्रशेखर शिखरे व त्यांचे अति तत्पर उत्साही उप अभियंता इंजि रविकांत काळवाघे यांचे कितीही अभिनंदन केले तरी कमीच आहे. यांनी जोशी साहेब यांचे पुढे दोन पाऊले टाकले आहेत. यावर्षी जिजाऊ सृष्टी येथे नवीन आर सी सी पन्नास फूट लांब, तीस फूट रुंद व बारा फूट उंच मंच उभारण्यात आला असून ती किमया याच जोडीची आहे. दोन्ही बाजूला पायरी व रॅम्प आहे. पुढील काळात मंचा खाली खोल्या बांधल्या जाणार आहोत. या सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतानाच आपणास विनंती आहे की कृपया वेळ काढून या महान सहकारी मंडळींना भेटून आनंद व्यक्त करावा... मित्रांनो, अधिकारी लाखो असतील. पण सामाजिक बांधिलकीची जाणीव जपून अधिकारांचा सकारात्मक उपयोग कसा करावा याचे एक आदर्श उदाहरण म्हणजेच हे तिन अधिकारी, त्यांचे सहकारी व विशेषतः म्हणजे त्यांच्या शब्दांना झेलणारे ठेकेदार हेच आहेत. जिजाऊ यांना खूप खूप सुख शांती समाधान आणि आनंद देवो हीच सदिच्छा व अभिनंदन...
++ मित्रांनो, जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा संचालक इंजि पुरुषोत्तम कडू साहेब व इंजि अंगद काळे आपल्या पातळीवर जमेल तसे आर्थिक नियोजन करत असतात. आपणास विनंती आहे की कृपया आपण यावर्षीच्या जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येताना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी हीच विनंती आहे. पैसे जमा करून पावती घेणे . कमीतकमी दोन लाख रुपये शिवदान देणारांचे मी नाव जाहीर करून आभार मानेल.. मित्रांनो, मला इतर काही समाजातील काही मान्यवर भेटले. त्यांनी माहिती दिली की ते समाज कामात व्यस्त असतात. एवढेच नाही तर त्यांनी आयुष्यात कमावलेली सर्व स्थावरजंगम मालमत्ता समाज कामासाठी दान दिली आहे. मराठा सेवा संघाच्या जून्या एक नेता कॅप्टन डॉ भारती जाधव यांचे नुकतेच लातूर येथे निधन झाले होते. त्या जन्मापासूनच आर्य समाजाशी निगडीत होत्या. मराठा सेवा संघाचे काम करत . त्या अविवाहित होत्या. त्यांनी लातूर येथील बंगला व इतर सर्व बाबी सुमारे दोनशे लाख रुपये किंमतीची मालमत्ता आर्य समाज संस्थास दान दिली आहे. स्मृतीशेष कॅप्टन डॉ भारती जाधव यांना भावपूर्ण शिवांजली अर्पण करताना एकच विनंती आहे की आपणही जीवंतपणीच दातृत्वाची झलक दाखवून आम्हाला आपला सन्मान करण्याची संधी द्यावी.. मी ५ जानेवारी पासून पूर्ण वेळ जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे १५ जानेवारी पर्यंत उपस्थित राहणार आहे. तरी ज्या ज्या दानशूरांना कमीतकमी दोन लाख रुपये शिवदान माझ्याकडे देण्याची इच्छा आहे त्यांनी चेक घेऊन फोन करून यावे...
नववर्ष स्वागत व जिजाऊ जन्मोत्सव सदिच्छा...
0 Comments