कळंब येथे सुगाव येथील घटनेचा मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने जाहीर निषेध !
कळंब - लातुर जिल्ह्यातील सुगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नामफलकाचा चौक पाडून गाव गुंडांनी नुकसान केल्याने कळंब तालुका मानवहित लोकशाही पक्षाच्यावतीने कळंब येथील तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन कळविण्यात आले आहे.देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मातंग समाजाची अस्मिता असून त्यांनी, महाराष्ट्रासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे. तसेच त्यांचे साहित्य दर्जेदार असून त्यांनी रशिया मध्ये जाऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सातासमुद्रा पलीकडे जाऊन गाणारे शाहीर, साहित्यिक म्हणून त्यांची ओळख असताना. दिनांक २६डिसेंबर या दिवशी मौजे सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी काही समाजकंटकांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा चौक पाडून नुकसान केले आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत,व समाजात असे कृत्ये करून तेढ निर्माण केला आहे. त्यामुळे आम्ही अशा जातीयवादी गावगुंडाचा जाहीर निषेध करत आहोत.तरी सदरील घटना अतिशय गंभीर असून या घटनेची तात्काळ दखल घेऊन सदर गावाच्या हद्दीतील पोलीस ठाण्याणे असे क्रत्य करणाऱ्यास तात्काळ अटक करून गुन्हा नोंद करावा, व समाजाला योग्य न्याय द्यावा.अन्यथा मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रेमींच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा मानवहित लोकशाही पक्षाचे कळंब तालुका अध्यक्ष धनंजय ताटे, शहराध्यक्ष सनी कांबळे यांनी दिला आहे. या निवेदनावर आकाश ताटे,किरण सहाणे,आशोक गायकवाड, बाबासाहेब बचुटे, आशीष कांबळे, अशीष शिंदे,गणेश कुचेकर,विकी भंडारे,महेश ताटे, उमेश देडे, सुरेश कांबळे, ऋषिकेश परकर, रोहित बचुटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments