टेंभुर्णीच्या बाजारपेठेतून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ३० हजार रुपये केले लंपास टेंभुर्णी पोलिसांनपुढे आव्हान ?
टेंभुर्णी[ प्रतिनिधी ]:- टेंभुर्णी येथे जुना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेले प्रितम जनरल स्टोअर्स ला शुक्रवार दि.२७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. चे दरम्यान सोलापूरचे व्यापारी बसवराज कोरळी( वय ४५ वर्षे) माल देत असताना महिंद्रा पिकअप ( क्रं. एम.एच.१२क्यू.जी. ७९७७) या मालवाहू चारचाकी मधील डाव्या साईडची काच खाली करून आतील रोख रक्कम २५०००० रुपये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा पळवून नेल्याची घटना घडली असून त्याच्या अगोदर कंदर येथील शेतकरी दत्तात्रय आजिनाथ कदम (वय ५० वर्षे) यांनी बँक ऑफ इंडिया टेंभुर्णी शाखेतून ८३००० रुपये काढले व मार्केट यार्डमधील प्रिन्स मशिनरी येथे पाण्याच्या मोटरचा स्टार्टर दुरूस्ती करण्यासाठी दुकानात गेले असता त्यांच्या मोटारसायकलच्या ( क्रमांक एम.एच.४५ व्ही १३४९) हँडलला अडकवलेली अज्ञात दोन चोरट्यांनी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ८३ हजाराची बॅग पळवून पोबारा केला असून टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत चार तासात भर बाजारपेठेतून सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम पळवून नेल्याने टेंभुर्णी पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले असून टेंभुर्णी चे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे आल्यापासून चोरी प्रकरणातील एकही तपास लागला नसल्याने टेंभुर्णीच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आत्तापर्यंत झालेल्या चैन स्नॅचिंग, बसस्थानकावर महिला प्रवासीचे गंठण चोरी, मोटारसायकल च्या डिक्कीतून १लाख १० हजार,सातपुते यांचे घर भरदिवसा फोडून सव्वा लाखांचा ऐवज चोरीचा, तसेच तीन मोटारसायकल चोरी अशा अनेक चोऱ्यांचा तपास लागेल काय ? याची सर्व सामान्यातून चर्चा होत आहे. पोलीसांचा चोर व गुन्हेगारांवरती कसल्याही प्रकारचा वचक राहीला नसल्याचे सर्वसामान्य नागरीकातून बोलले जात आहे या घटणेची माहीती समजताच टेंभुर्णी पो.स्टेशन चे API राजेंद्र मगदुम, PSI भोसले ,पो. बिरु पारेकर,पो.शिवाजी भोसले, पो.गरजे, यांनी जाऊन घटणास्थळी पहानी केली. वरील घटणेची टेंभुर्णी पोलिसठाण्यात नोंद झाली असुन पुढील तपास पो.निरीक्षक राजकुमार केंद्र तपास करीत आहेत


0 Comments