वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सुरू केली मोफत व्यायाम शाळा.
अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पाश्चिमात्य संस्कृती बोकाळत आहे. वाढदिवस म्हटला की हारतुरे स्वागत समारंभ ठरलेला यामुळे मोठा खर्चही ठरलेला परंतु..या सर्व विषयाला बगल देत लवूळ तालुका माढा येथील युवक गोविंद नलवडे यांनी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करत आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना जोपासत प्रयास फाउंडेशन च्या माध्यमातून गावातील तरुणांसाठी मोफत व्यायाम शाळा सुरू करून दिली आहे. याबरोबरच आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून क्रिकेट स्पर्धेचेही नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवक नेते अमरकुमार माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी साम्राज्य आरमार संघटनेचे अध्यक्ष उमेश पाटील, प्रभाकर नलवडे, प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू नलवडे, अशपाक तवक्कल, ऋषी वाल्मिकी, पत्रकार वसंत कांबळे, महेश बागल, अमित आयदाळे, नवनाथ जानराव, विष्णू गवळी, मुकुंद नलवडे, सुरज चव्हाण, रफिक मुजावर, रमेश डिकोळे, मंगेश जानराव, आकाश जानराव, शंकर वरडोळे, बालाजी नलवडे, दिनेश बिरकुटे, ओंकार नलवडे, बबलू डिकोळे, वैभव कदम, याबरोबरच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रयास फाऊंडेशनच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments