Hot Posts

6/recent/ticker-posts

जिव्हाळा विद्यामंदिर कुर्डुवाडी शहरात क्रीडा सप्ताहास सुरुवात.

























जिव्हाळा विद्यामंदिर कुर्डुवाडी शहरात क्रीडा सप्ताहास सुरुवात.
-------------------------------------  
 सायकल रॕलीद्वारे क्रिडा ज्योतीचे आगमन.
------------------------------------- 
कुर्डुवाडी-प्रतिनिधी.   सालाबाद प्रमाणे याही वर्षी जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डूवाडी येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाचे आयोजन 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.
       आज कुर्डूवाडी शहरातील गावदेवी मंदिरा ते कुर्डूवाडीतील  मुख्य रस्त्यावरून सायकल रॅलीद्वारे क्रीडाज्योत विद्यालयात  आणली. यानंतर मुख्याध्यापिका सारिका गोटे यांच्या हस्ते  क्रीडा साहित्याचे पूजन व क्रीडा ज्योतीचे अनावरण करून या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
       तद्नंतर शारीरिक खेळाचे महत्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीने खेळण्यासाठी ची शपथ यावेळेस देण्यात आली. 
          छोटा गट ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, वैयक्तिक व सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये धावणे,अडथळा शर्यत, लिंबू-चमचा, दोरी उड्या, त्याचबरोबर खो-खो,कबड्डी, हॉली बॉल,लंगडी आदी खेळ प्रकारांचे आयोजन या क्रीडा सप्ताहात करण्यात आले आहे.  
       सहभागी व विशेष प्राविण्य मिळवून चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका-सारिका गोटे यांनी सांगितले .
     या स्पर्धेत विजेते खेळाडू साठी सेल्फी पॉइंट करण्यात आला असून,
 हे वेगळेच आकर्षण ठरले आहे.यावेळी संस्थापक अध्यक्ष-शिवराज वायचळ,सचिव-अजित वायचळ,रवी शाह उपस्थित होते. 
        क्रीडा सप्ताहाचे आयोजन क्रीडा शिक्षक तथा क्रीडा विभाग प्रमुख-जयंत माळी,आकाश घोडके यांनी केले असून,यांना सहकार्य किशोर मोहोळे,रवी शाह, जयकुमार उपाध्ये, श्याम शिंदे,प्रदीप देशपांडे ,नवनाथ बुरकुले ,दिनेश आतकर,कृष्णा कोकाटे,मंगेश लचके,प्रशांत चोपडे,गीतांजली शिंदे,निलोफर सय्यद,सोनाली धुमाळ आदींसह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थितीत होते.

Reactions

Post a Comment

0 Comments